Tur rate
Tur rate  Agrowon
बाजार विश्लेषण

Tur Rate : देशाला यंदा तुरीची टंचाई भासणार?

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणेः देशात सध्या तुरीचे दर (Tur Rate) चांगले आहेत. गेल्यावर्षीची तूर आता कमी प्रमाणात शिल्लक आहे. तर देशातील उत्पादनही यंदा घटण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे यंदा तुरीला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील (Tur Market) अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीची आवक (Tur Arrival) वाढत आहे. तुरीला चांगली मागणी असल्याने दरही तेजीत आहेत.

सध्या तुरीला ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दकर मिळत आहे. मागील हंमात याच काळात ६ हजार ते ६ हजार २०० रुपये दर मिळत होता.

म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा दर जास्त आहेत.

देशातील दर जास्त असल्याने म्यानमारमधून तूर आयातीसाठी पडतळ आहे. परिणामी म्यानमारधून तूर आयात वाढण्याची शक्यता आहे.

तर देशातील बाजारात तुरीची आवक पुढील काळात वाढणार आहे. त्याचा बाजारावर दबाव येऊ शकतो. पण मागील वर्षीची तूर यंदा शिल्लक नाही.

तुरीची पाईपलाईन जवळपास रिकामी आहे. तसेच देशात चांगल्या गुणवत्तेच्या तुरीची मोठी टंचाई आहे. त्यामुळेच सध्या तुरीला चांगाल उठाव मिळत आहे.

पुढील काळात तुरीच्या डाळीलाही मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चांगल्या गुणवत्तेच्या तुरीची कमी दरात विक्री करण्याची शक्यता कमीच आहे.

पण यंदा शेतकऱ्यांनी चांगल्या दरासाठी कापूस आणि सोयाबीन रोखून धरले. तुरीला ७ हजारांपेक्षा जास्त दर मिळाल्यास शेतकरी तुरीची विक्री करू शकतात. 

केंद्र सरकार बाजारावर लक्ष ठेऊन

केंद्र सरकारने नुकतेच देशातील कडधान्य स्टाॅकिस्टना आपल्याकडील स्टाॅकची माहिती देण्यास सांगितले आहे.

त्यामुळं स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार सरकारच्या नियमानुसार तूर खरेदी करु शकतात. त्याचा काहीसा परिणाम बाजारावर जाणवेल.

बाजारात तुरीची आवक वाढल्यानंंतर दरावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी तुरीची विक्री कशी करतात, यावर तुरीचे दर काय राहतील, हे मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.


आफ्रिकेत कमी तूर उपलब्ध

पण यंदा देशातील तूर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. तसेच आफ्रिकेतील देशांमध्ये आता तुरीचा साठा कमी आहे. त्यामुळे आफ्रिकेतील देशांमधून पुढील काळात तुरीची आयात जास्त

होणार नाही. त्यामुळे यंदा देशातील तूर मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत असणार आहे. शेतकऱ्यांना यंदा चांगाल दर मिळू शकतो.


काय राहू शकते दरपातळी?


सध्या देशात तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळतोय. आवक वाढल्यानंतर दर काहीसे दबावात येऊ शकतात.

मात्र शेतकऱ्यांनी तूर आवकेचा दबाव न येऊ देता टप्प्याटप्प्याने विक्री केली तर दर टिकून राहतील.

चालू हंगामात तुरीची दरपातळी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT