Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Record Keepnig : निरोगी जनावर हा दुग्ध व्यवसायाचा कणा आहे. आपल्या कळपातील निरोगी जनावरे, आजारी जनावरे, औषधोपचारांचे नियोजन या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी नोंदी आवश्यक ठरतात.
Dairy Record Keepnig
Dairy Record KeepnigAgrowon

Dairy Business : निरोगी जनावर हा दुग्ध व्यवसायाचा कणा आहे. आपल्या कळपातील निरोगी जनावरे, आजारी जनावरे, औषधोपचारांचे नियोजन या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी नोंदी आवश्यक ठरतात.

पशुपालन व्यवसाय करत असताना, जनावरांच्या महत्त्वाच्या म्हणजे प्रजोत्पादन, दूध उत्पादन, औषध उपचार यांसारख्या गोष्टींच्या काटेकोर नोंदी ठेवल्या पाहिजे.  आपण किती पैसे खर्च करतो आणि किती पैसे येतात हे फक्त नोंदी ठेवल्यानच कळू शकत. नोंदी ठेवल्यामुळे व्यवसायात फायदा  होतोय की तोटा हे कळत. आपल्या गोठ्यातील जनावरांच्या प्रजातीनुसार, त्यांच्या गुणधर्मानुसार नोंदी केल्यास योग्य समतोल राखून नफा मिळवण शक्य होत. एक पशुपालक म्हणून फक्त तुमच्या गोठ्यात किती जनावरे आहेत हे माहित असून चालणार नाही, तर किती जनावरे दुधात आहेत? कोणते जनावर किती दुध देत? कोणत जनावर आजारी आहे? त्यावर कोणते औषधोपचार केलेत? साथीच्या रोगांचे प्रमाण किती आहे? या सगळ्या गोष्टी फक्त नोंदी ठेवल्यामुळे कळतात. त्यामुळे तुम्ही जर नोंदी ठेवल्या तर आर्थिक नुकसान टळू शकत हे लक्षात ठेवा.

नोंदी का ठेवाव्यात ? 

कळपातील जनावरांची पैदास क्षमता, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांची आनुवंशिकता माहिती असायला हवी. यासाठी जनावरांची वंशावळ पत्रिका माहित असण आवश्यक आहे. जनावर जन्मल्यापासून नोंदी ठेवल्या असतील तर जनावरांची अनुवंशीक जडणघडण कळते. त्यातूनच दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.  कळपातील एकाच प्रजातीतील प्रत्येक जनावराची उत्पादनक्षमता वेगवेगळी असते. कळपातील उच्च प्रतीच्या पैदासक्षम जनावरांच्या निवडीसाठी नोंदी आवश्यक असतात. आपल्याच कळपातील जनावरांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी या नोंदी उपयोगाला येतात.      

नोंदवहीत नोंद करताना वासरांची दैनंदिन नोंदी ठेवाव्यात. याशिवाय कृत्रिम रेतन,  दूध उत्पादन आणि विक्री, लागणारे पशुखाद्य,  औषध उपचार, लसीकरण, जंत व गोचीड निर्मूलन, दैनंदिन जमा खर्च आणि पशूप्रजननाची नोंद ठेवावी.  अशाप्रकारे नोंदवहीच महत्त्व ओळखून दररोज नोंदी ठेवल्या तर आपला व्यवसाय फायद्याचा ठरतोय की तोट्याचा हे लक्षात येत. 

Dairy Record Keepnig
Animal Record Keeping : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे महत्व काय?

नोंद वहीत कोणकोणत्या नोंदी ठेवाव्यात.  

वासरांची नोंद

कृत्रिम रेतन नोंद

दैनंदिन दुधाच्या नोंदी 

दूध उत्पादन आणि विक्री नोंद

दैनंदिन पशुखाद्य नोंद       

औषध उपचार नोंद

लसीकरण नोंद

जंतनिर्मूलन नोंद

गोचीड निर्मूलन नोंदवही

दैनंदिन जमा खर्च नोंदवही

पशूप्रजनन रोजनिशी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com