Turmeric Market  Agrowon
बाजार विश्लेषण

Turmeric Market: हळदीच्या भावाने गाठला १० हजारांचा भाव

Turmeric Rate : देशातील बाजारात हळदीचे दर सध्या तेजीत आहेत. हळदीचे भाव प्रतिक्विंटल १० हजार रुपयांच्या दरम्यान पोचले आहेत. तर वायद्यांमध्ये हळद ११ हजार रुपयांवर पोचले आहेत. हळदीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज असल्याचे जाणकारांनी सांगितले.

Team Agrowon

Turmeric Bazar : पुणेः देशातील बाजारात हळदीचे दर सध्या तेजीत आहेत. हळदीचे भाव प्रतिक्विंटल १० हजार रुपयांच्या दरम्यान पोचले आहेत. तर वायद्यांमध्ये हळद ११ हजार रुपयांवर पोचले आहेत. हळदीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

यंदा देशातील हळद लागवड कमी राहण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत महत्वाच्या हळद उत्पादक महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात अनेक भागात चांगला पाऊस नाही. तर काही भागात पावसामुळेही लागवडी खोळंबल्या आहेत. चालू हंगामात महाराष्ट्रात १० ते २० टक्क्यांनी लागवड कमी राहण्याचा अंदाज आहे. तर तमिळनाडूतील लागवड १० ते १५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लागवडही १८ ते २२ टक्क्यानी घटण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात घटली. सध्या बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा ५५ टक्क्यांनी कमी आहे. त्यातच आंध्र प्रदेश आणि काही हळद उत्पादक भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हळदीची बाजारातील आवक कमी झाली. यामुळे दरवाढीला आधार मिळाला. मसाला बोर्डाच्या अंदाजानुसार, देशात १३ लाख ३० हजार टन हळद उत्पादन झाले होते. तर यंदा उत्पादनात १८ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हळद बाजारातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

हळद निर्यतीचा विचार करता देशातील हळद निर्यात मागील तीन महिन्यांमध्ये जवळपास ४० टक्क्यांनी वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारातच हळदीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारातच जास्त मागणी आहे. परिणामी भारतातून निर्यात वाढत आहे. याचा देशांतर्गत बाजारात हळदीला आधार मिळत आहे. 

आजची भावपातळी

हळदीच्या वायद्यांमध्ये आज मोठी वाढ झाली. आज दुपारपर्यंत हळदीचे वायदे ११ हजार २९६ रुपयांवर होते. तर बाजार  समित्यांमधील भावातही आज मोठी सुधारणा झाली. बाजार समित्यांमधील आवक कमी असल्याने दराने काही बाजारांमध्ये १० हजारांचा टप्पा गाठला. आज बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १० हजार रुपये भाव मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT