Soybean Rate
Soybean Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; देशात काय स्थिती?

Anil Jadhao 

अनिल जाधव

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात (Soybean Rate) सतत चढ उतार सुरु आहेत. मात्र देशातील सोयाबीन दर मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत. पण आता आंतरराष्ट्रीय बाजारात दर आणखी वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे देशातील दरही वाढतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढलेले नाहीत. मागील महिनाभराचा विचार करता, दरात केवळ चार ते पाच वेळा तेजी मंदी पाहायला मंदी. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन बाजार सतत बदलत गेला. पण मागील दोन दिवसांपासून सोयाबीन, सोयातेल आणि सोापेंडचे दर वाढले आहेत. मात्र देशातील बाजारात चैतन्य दिसले नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा झाली. सोयाबीनचे वायदे आज १४.६५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. एक बुशेल्स म्हणजे २७ किलो सोयाबीन असते. तर सोयातेलाच्या दरातही किंचित वाढ झाली होती. सोयातेलाचा बाजारही ६३.४३ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाला. काल सोयातेलाचे दर तुटल्यानंतर आज दर वाढल्याने सोयाबीन बाजारालाही काहीसा आधार मिळाला. सोयापेंडचे दर जवलपास १ टक्क्याने वाढले होते. काल सोयापेंडच्या दरात अडीच टक्क्यांची घट झाली होती. तर आज सोयापेंडचे वायदे ४४९ डाॅलर प्रतिटनावर पोचले.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर आज वाढले असताना देशातील दर मात्र कायम होते. आज देशातील महत्वाच्या बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला. तर आज देशातील बाजारांमध्ये जवळपास २ लाख ७० हजार क्विटंल सोयाबीनची आवक झाली होती. तसेच देशातील सोयापेंडचे दर ४२ हजार रुपये प्रतिटनांवर स्थिर आहेत.

………….
सोयापेंड निर्यातवाढीचा आधार
देशातील सोयाबीनचे दर नरमल्यानंतर सोयापेंडचेही दर कमी झाले. त्यामुळे मागील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये देशातून मागील २१ महिन्यांतील उच्चांकी सोयापेंड निर्यात केली. नोव्हेंबरमध्ये जवळपास १ लाख ६४ हजार टन सोयापेंड निर्यात झाली. देशातून सोयापेंड निर्यात वाढल्याने सोयाबीन बाजारालाही आधार मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
…………
दर वाढणार का?
सध्या देशातील बाजारात सोयाबीनचे दर स्थिर असल्याने शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत. जानेवारीत खाद्यतेल बाजारातही वाढ होऊ शकते. त्यामुळे सोयाबीनला आधार मिळू शकतो. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना सरासरी किमान ५ हजार तर कमाल ६ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT