Balhirada Procurement
Balhirada Procurement Agrowon
बाजार विश्लेषण

बाळहिरडा खरेदीप्रश्‍नी आंदोलनाची तयारी सुरू

टीम ॲग्रोवन

पुणे : ‘‘बाळहिरडा खरेदीविषयी (Balhirada Procurement) व्यापक आंदोलनाची (Protest) तयारी सुरू आहे. आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींना ही निवेदन दिले जाणार आहे,’’ अशी माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे (Adv. Natha Shingade) यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या, बाळहिरडाची खरेदी वर्षानुवर्षे आदिवासी विकास महामंडळ करते. परंतु मागील तीन ते चार वर्षांपासून आदिवासी विकास महामंडळाने बाळहिरडा खरेदी करणे थांबवले आहे. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी बाळ हिरड्याचे भाव पाडले आहेत. आदिवासींचे शोषण यातून सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर किसान सभेने नाशिक येथे आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला यांच्याशी चर्चा केली होती. या बैठकीत किसान सभेने तीन मुख्य मागण्या केल्या होत्या.

आदिवासी भागात उत्पादित होणारा बाळहिरडा महामंडळाने त्वरित खरेदी सुरू करावा. त्यास रास्त दर द्यावा. बाळहिरडा उत्पादक शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन, दीर्घकालीन बाळहिरड्याचे धोरण निश्‍चित करण्यासाठी एक अभ्यास समिती नेमावी. निसर्ग चक्रीवादळात झालेली बाळहिरड्याची नुकसानभरपाई मिळावी. या मागण्या संघटनेच्या शिष्टमंडळाने केल्या. किसान सभेने बाळहिरड्याची खरेदी करण्याविषयी सविस्तर निवेदन व्यवस्थापकीय संचालकांना सादर केले आहे.

...अन्यथा आंदोलनाचा निर्धार

आदिवासी विकासमंत्र्यांच्या पुढाकाराने हा प्रश्‍न सुटावा, अशी किसान सभेची अपेक्षा आहे. पण हा प्रश्‍न शासनाने रेंगाळत ठेवल्यास किसान सभेच्या वतीने व्यापक जनआंदोलन उभे केले जाईल, असा निर्धार किसान सभेच्या जिल्हास्तरीय बैठकीदरम्यान करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनास हवामान अनुकूल

Fodder Shortage : हिरव्यागार उसाची चाऱ्यासाठी तोड

Pomegranate Farming : प्रशिक्षित स्थानिक मजुरांमुळे डाळिंब उत्पादकांचा खर्च वाचला

Rain Update : उंबर्डे, भुईबावडा परिसराला पावसाने पुन्हा झोडपले

Mango Season : आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सपुंष्टात

SCROLL FOR NEXT