Mung Rate  Agrowon
बाजार विश्लेषण

Moong Rates : देगलूरमध्ये मुगाला नऊ हजारांचा भाव

बाजार समितीत पहिल्याच दिवशी १७० क्विंटलची आवक

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : खरीप हंगामातील मूगा च्या (Moong) खरेदीचा प्रारंभ गुरुवारी (ता. ८) देगलूर कृषी उत्पन्न बाजार (Agriculture Produce Committee) समितीच्या प्रांगणात करण्यात आला. या वेळी एफएक्यू मुगाला प्रतिक्विंटल नऊ हजार ११ रुपये भाव मिळाला. पहिल्याच दिवशी मोंढा बाजारपेठेत १७० क्विंटल मुगाची आवक आली होती. मुलाला प्रति क्विंटल सरासरी सात हजार ६५६ रुपये दर मिळाला.

या वर्षीच्या खरीप हंगामातील मुगाला दहा हजारांवर भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. अतिवृष्टीत बहुतांश खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांजवळ फक्त वर्षभर पुरेल एवढी डाळ यातून मिळेल, अशी अपेक्षा आहे. देगलूर मोंढा बाजार समितीच्या प्रांगणात गुरुवारी दुपारी बारा वाजता मुहूर्ताचा श्रीगणेशा अशोक वद्येवार यांच्या अडतीसमोर करण्यात आला. या वेळी एफएक्यू मुगाला प्रतिक्विंटल नऊ हजार ११ रुपये भाव मिळाला. पहिल्याच दिवशी मोंढा बाजारपेठेत १७० क्विंटल मुगाची आवक आली होती. मुगाला प्रति क्विंटल सरासरी सात हजार ६५६ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. या वेळी व्यापारी, शेतकऱ्यांसह अडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास मैलागीरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष मधुकर नारलावार, गंगाधर पाटील मुंडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अशोक सुंदाळे, कर्मचारी विजय कल्याणी, संजीव रेड्डी या वेळी उपस्थित होते.
मोंढा बाजारपेठेच्या बाहेर बसलेल्या व्यापाऱ्यांकडून धान्याच्या खरेदी-विक्रीत शेतकऱ्यांची लुबाडणूक होणार नाही यासाठी बाजार समितीने इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे व इतर साहित्याची तपासणी करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अनेक मोंढ्यातील व्यापारीच अडत चुकविण्यासाठी बाहेर व्यापाऱ्यांना बसवीत असल्याचीही चर्चा होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी पुढे येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Power Project: थोरात कारखान्याने उभारला ५० किलोवॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प

Sahyadri Jamun Honey: सह्याद्रीतील जांभूळ मधाचे वैज्ञानिकदृष्ट्या औषधी गुणधर्म सिद्ध ; ‘एनसीएल’चे संशोधन

Assembly Constituency Restructuring: विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार : राम शिंदे

Artificial Insemination Programme: यशस्वी कृत्रिम रेतन करण्यात भंडारा राज्यात अव्वल

Uddhav Thackeray: गद्दारांच्या किडीने महाराष्ट्र पोखरला : उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT