Raisins
Raisins Agrowon
बाजार विश्लेषण

चाळीस हजार टन बेदाण्याची विक्री

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः गेल्या वर्षी द्राक्ष हंगामात (Grape Season) आणि बेदाणा निर्मितीच्या (Raisins Production) काळात बदलत्या वातावरणाचा फटका बेदाण्याला बसला. परिणामी, बेदाण्याचा दर्जा (Raisins Quality) घसरला आहे. त्यातूनही दर्जेदार बेदाण्याला चांगले दर मिळाले. गेल्या महिन्यात बेदाण्याला प्रति किलोस ११० ते २२० रुपये असा दर होता. आतापर्यंत सुमारे ४० हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे; मात्र सध्या बेदाण्याच्या दरात प्रति किलोस १० ते १५ रुपयांची घसरण झाली आहे.

गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीच्या संकटावर मात करून बेदाणा उत्पादक शेतकरी बेदाणा निर्मितीसाठी पुढे आले; मात्र पावसामुळे द्राक्षाचे नुकसान झाले. त्यानंतर बेदाणा निर्मितीसाठी पोषक हवामान नव्हते. परिणामी, बेदाणा तयार करण्यासाठी विलंब लागत होता. या साऱ्याचा परिणाम बेदाण्याच्या दर्जावर झाला. त्यातूनही शेतकऱ्यांनी दर्जेदार बेदाणा तयार करण्यासाठी काटेकोर नियोजन करून चांगला बेदाणा तयार केला. गेल्या वर्षी राज्यात सुमारे १ लाख ६० हजार टन इतका बेदाणा तयार झाला. २०२०-२१ पेक्षा उत्पादनात १० हजार टनांनी घट झाली आहे.

नव्या बेदाण्याची फेब्रुवारी महिन्यात आवक सुरू झाली. या वेळी बेदाण्याला १८० ते २३० रुपये प्रति किलो असे दर मिळाले. त्यानंतर बाजारात बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे काही अंशी बेदाण्याचे दर कमी झाले होते. त्यानंतर बेदाण्याचे दर टिकून राहिले. त्यामुळे शेतकरी बेदाणा विक्रीसाठी पुढे येत होते. त्यानंतर बाजारात बेदाण्याची मागणी कमी झाली. परंतु कमी दर्जाचा बेदाणा बाजारात येत असल्याने अपेक्षित उठावही होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गेल्या चार महिन्यांत सुमारे ४० हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. सध्या शीतगृहात १ लाख ३० हजार टन बेदाणा शेतकऱ्यांनी ठेवला आहे. बाजारपेठेत विक्रीसाठी वर्षभर पुरेल इतका बेदाणा आहे. त्यामुळे बेदाणा कमी पडणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. येत्या काळात सण, उत्सव नाही, त्यामुळे शेतकरी बेदाणा विक्रीसाठी दराची परिस्थिती पाहूनच विक्रीसाठी पुढे येत आहेत. ऑगस्ट महिन्यात गोकुळ अष्टमी, त्यानंतर गणपती असे उत्सव आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात बेदाण्याच्या मागणीत वाढ होऊन दर वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बेदाणा......दर (प्रति किलो)

पिवळा बेदाणा ः ११० ते १६०

हिरवा बेदाणा ः ९० ते २००

काळा बेदाणा ः २५ ते ३०

अतिपाऊस आणि बेदाणानिर्मितीस पोषक असे वातावरण नसल्याने बेदाण्याचा दर्जा घसरला आहे; मात्र अशा परिस्थितीही दर्जेदार बेदाणा शेतकऱ्यांनी तयार केला होता. या बेदाण्याला चांगले दर मिळाले आहेत; मात्र सध्या कमी दर्जाचा बेदाणा बाजारात येत असल्याने दरात घसरण झाली आहे. कदाचित येत्या काळात दर वाढतील असा अंदाज आहे.
राजेंद्र कुंभार, अध्यक्ष, सांगली-तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT