Cotton Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Cotton Rate : कापूस दर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापूस दर तेजीत आहेत. तर देशातील बाजारात कापूस दर आजही कायम होते. तर चीनमधील कोरोना परिस्थितीमुळे चीनची कापूस मागणी कमी होऊ शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

Anil Jadhao 



अनिल जाधव
पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापूस दर (Cotton Rate) तेजीत आहेत. तर देशातील बाजारात कापूस दर आजही कायम होते. तर चीनमधील कोरोना परिस्थितीमुळे चीनची कापूस मागणी कमी होऊ शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात वेगाने घडामोडी घडत आहेत. आधी आपण त्याचा आढावा घेऊ. आंतरराष्ट्रीय कापूस बाजारातील तेजी आजही कायम होती. चीनमध्ये सध्या कोरोना उद्रेक झाल्याचं सांगितलं जातं. तसंच भारतासह काही देशांना सरर्कतेचा इशाराही देण्यात आला. त्यामुळं सध्या कापूस बाजाराचं लक्ष कोरोनाकडंही आहे.

चीन कापसाचा मोठा ग्राहक आहे. परिणामी चीनच्या मागणीचा परिणाम कापूस बाजारावर होऊ शकतो. पण दुसरीकडं जगातील कापूस उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. तर भारतातील शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरला. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर सुधारण्यास मदत होत आहे.

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात सोमावारपासून सुधारणा पाहायला मिळत आहे. सोमवारी कापूस बाजार ८२.५८ सेंटवर सुरु झाला होता. म्हणजेच रुईचा दर १५ हजार रुपये प्रतिक्विंटल होता. मात्र कापसाचा हा दर आता ८७.६१ सेंट प्रतिपाऊंडवर पोचला. रुपयात हा दर १६ हजार रुपये प्रतिक्विंटल होतो. आज काही वेळ वायद्यांनी ८९.६२ सेंट म्हणजेच १६ हजार ३५० रुपयांवर पोचला होता. पण शेवटी दर काहीसे कमी होत बाजार ८७.६१ सेंटवर बंद झाला.

देशातील कापूस उत्पादनही यंदा कमी राहण्याचा अंदाज आहे. काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने कापूस उत्पादनाचा अंदाज पुन्हा एकदा कमी केला. तसंच पुढील काळातही सीएआय उत्पादनाचा अंदाज कमी करेल, असं जाणकार सांगत आहेत. कारण दरवर्षी असच घडतं.


मागीलवर्षीचे अंदाज
मागील हंगामात सीएआयने ऑक्टोबर २०२१ मध्ये देशात ३६० लाख गाठी कापूस उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला होता. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. नंतर उत्पादन ३३५ लाख गाठींवर स्थिरावेल, असं म्हटलं. पण त्यानंतर अंदाज सतत बदलत ३२५ लाख गाठी, नंतर ३१५  आणि शेवटी ३०७ लाख गाठी कापूस उत्पादन झाल्याचे सीएआयने स्पष्ट केले.


यंदाचे अंदाज
यंदाही हंगामाच्या आधी सीएआयने ३७५ लाख गाठींपर्यंत कापूस उत्पादन वाढेल, असे म्हटले होते. ऑक्टोबरमध्ये ३६५ वरून ३४३ लाख गाठींवर सीएआयचा अंदाज आला. तर ताज्या अंदाजानुसार सीएआयनं ३३९ लाख टन उत्पादन होईल, असं म्हटलंय.

महाराष्ट्रात उत्पादन वाढलं?
म्हणजेच सीएआय आपला अंदाज कायम ठेवत नाही. त्यामुळं यंदाही कापूस उत्पादन गेल्यावर्षीएवढंच राहील, असा अंदाज आहे. सीएआयनं आंध्र प्रदेश, पंजाब, कर्नाटक आणि हरियानात कापूस उत्पादन कमी झाल्याचं सांगितलं. मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उत्पादन वाढल्याचा अंदाज व्यक्त केला. पण महाराष्ट्रातील शेतकरी वेगळंच सांगतात. उत्पादकता यंदा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

वापर, निर्यात वाढू शकते
सीएआयनं यंदा देशातील कापूस वापर आणि निर्यातही कमी राहीलं, असं म्हटलंय. मात्र वापर आणि निर्यात नंतर वाढूही शकते. पण उत्पादन घटलं हे नक्की. त्यामुळंच आंतरराष्ट्रीय बाजार वाढतोय आणि देशात दरातील नरमाई उद्योगांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.

देशातील दर
सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार १०० ते ९ हजार रुपये दर मिळत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही दर सुधारत आहेत. त्याचा फायदाही देशातील कापूस बाजाराला मिळू शकतो. पण कोरोनाचेही सावट सध्या दिसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी टप्प्यटप्याने कापूस विक्री सुरु ठेवावी, असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate: कांदा दर घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त

Agriculture Ministry: शेतकऱ्यांसाठी काम करायचे होते: कोकाटे

Monsoon 2025: जुलैअखेर मॉन्सून काठावर पास

Maharashtra Rain: पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता कायम

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

SCROLL FOR NEXT