Marigold  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Flower Market : नागपुरात झेंडू ३० रुपये किलो

Marigold Rate : गणेशोत्सवाच्या काळात आवक कमी असल्याने तेजीत असलेल्या झेंडू फुलांचे व्यवहार सध्या सरासरी २५ ते ३० रुपये या घाऊक दराने होत असल्याची माहिती नागपूरच्या नेताजी बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : गणेशोत्सवाच्या काळात आवक कमी असल्याने तेजीत असलेल्या झेंडू फुलांचे व्यवहार सध्या सरासरी २५ ते ३० रुपये या घाऊक दराने होत असल्याची माहिती नागपूरच्या नेताजी बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. सोमवारी (ता. २३) किरकोळ बाजारात दर प्रतिकिलो ५० रुपये होते.

नागपूरलगतच्या अनेक गावांमध्ये फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये झेंडू, गुलाब, शेवंती यासारख्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. गणपती, दसरा, दिवाळी या कालावधीत फुलांना मागणी असते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान गणेशोत्सव काळात बाजारात झेंडूची उपलब्धता कमी असल्याने दर ५० ते ८० रुपयांवर पोहोचले होते. बाजारात झेंडू फुलांची किरकोळ विक्री १०० ते १२० रुपये किलोने होत होती. आता मात्र आवक वाढल्याने घाऊक दर २५ ते ३० रुपये झाला आहे.

दसऱ्याला दर कमी असले तरी दिवाळीत दर ५० रुपयांपेक्षा अधिक राहतील, अशी अपेक्षा उत्पादक व्यक्त करत आहेत. दरम्यान झेंडू फुलांचे दर सोमवारी (ता. २३) किरकोळ बाजारात ५० रुपये किलो होते.

गणेशोत्सव काळात फुलांची आवक कमी आणि मागणी जादा होती. त्यामुळे दर ५० ते ८० रुपये प्रतिकिलोप्रमाणे मिळाले. आता मात्र आवक वाढल्याने दर २५ ते ३० रुपयांवर घसरले आहेत. परिणामी पुरती निराशा झाली आहे. येत्या काळात दरात तेजीची शक्‍यता असून दिवाळीचा हंगाम पैसे देऊन जाईल, अशी अपेक्षा आहे.
- अमोल भिंगारे, उत्पादक, तेलगाव, कळमेश्‍वर, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT