Mango Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Rate Crash: सिंधुदुर्गमध्ये आंब्याच्या भावात घसरण

Mango Market: सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये आंबा पेटीचा दर अडीच ते तीन हजारांवर येऊन ठेपला असून, स्थानिक बाजारात देखील प्रति डझन ८०० ते १२०० रुपयांमध्ये आंबा विक्री होत आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात आंबा दरात मोठी घसरण झाली असून, सध्या हापूस आंबा पेटी तीन हजार ते अडीच हजारांपर्यंत मिळत आहे. किरकोळ विक्रीचे दर मात्र अजूनही काहीसे टिकून असून प्रति डझन ८०० ते १२०० रुपयांपर्यंत आहेत. आंब्याची आवक वाढल्याचा हा परिणाम मानला जात आहे.

या वर्षी आंबा हंगाम सुरू झाल्यापासून आंब्याला चांगला दर मिळत होता. चार ते पाच डझनांच्या पेटीला साधारणपणे सहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत होता. तर स्थानिक बाजारपेठांमध्ये प्रति डझन ते १२०० ते १५०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. परंतु गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात तापमान वाढ पुन्हा होऊ लागली.

या तापमानवाढीमुळे आंबा परिपक्व होण्याची गती वाढली. वाशी मार्केटमध्ये आंबा पेट्यांची आवक वाढली. याशिवाय स्थानिक बाजारपेठांमध्ये आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागला. त्यामुळे आंब्याच्या दरात घसरण झाली.

वाशी मार्केटमध्ये अडीच ते तीन हजारांपर्यंत पेटीला दर मिळत आहे. तर स्थानिक बाजारपेठांमध्ये प्रति डझन ८०० ते १२०० रुपये दर आहे. आंब्याची आवक एकाच वेळी वाढल्याने दर घसरले असले तरी हंगामापुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. हंगाम २० एप्रिलपर्यंतच चालेल असा अंदाज बागायतदारांचा आहे. त्यामुळे मेमध्ये आंबा अल्प प्रमाणात राहील. या कालावधीत दरात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT