Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Market: अमरावती बाजार समितीत आंबा आवक ५०० क्‍विंटलवर

Seasonal Mango Supply: अमरावती बाजार समितीत आंब्याची आवक वेगाने वाढत असून बैगनपल्लीसह विविध जाती बाजारात दाखल झाल्या आहेत. मागणीत वाढ झाल्यास दर तेजीत येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: स्थानिक बाजार समितीतही हंगामी आंब्याची आवक वाढीस लागली आहे. यामध्ये बैगनपल्लीसह विविध जातींच्या आंब्यांचा समावेश असून सध्या ५०० क्‍विंटल इतकी आंबा आवक होत आहे. यापुढील काळात मागणीत वाढ झाल्यास दर तेजीत येईल, अशी शक्‍यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली.

अमरावती बाजार समितीत हंगामी आंबा फळांची देशभरातून मोठी आवक होते. यंदा आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांसह स्थानिक आंबा वाणाची देखील आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानुसार बैगणपल्ली जातीच्या आंब्याची १२० क्‍विंटल इतकी आवक होत आहे.

या आंब्याचे दर ८००० ते १०००० रुपये क्‍विंटलवर पोहोचले आहेत. मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यास दरात आणखी तेजीची शक्‍यता वर्तविण्यात आली. बैगणपल्ली सोबतच स्थानिक लालपट्टा (ज्या आंबा फळांवर लाल रंगाचा पट्टा आहे) वाणाची देखील नियमित आवक होत आहे.

सुमारे १४० क्‍विंटल इतकी ती आवक असून याचे दर १०००० ते १४००० रुपयांवर पोहोचले आहेत. अमरावती बाजार समितीत यंदा हंगामी आंबा फळांची आवक काहीशी उशिरा सुरू झाली. त्यामुळे मागणीत वाढ नोंदविण्यात आली आहे.

नागपूरच्या कळमना बाजाराचा विचार करता या ठिकाणी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच आंबा आवक सुरू झाली. बाजारात आवक होणाऱ्या या कैरीचे दर ५००० ते ५५०० रुपयांवर होते. सुरुवातीला याची आवक ५० क्‍विंटल इतकी मर्यादित होती. त्यानंतरच्या काळात आवक वाढत १५० क्‍विंटलवर पोहोचली. आवक वाढती असल्याने दर दबावात आले. आवक वाढती असताना या काळात कैरीचे दर ३५०० ते ४००० रुपयांवर होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT