Maize Marekt Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : खानदेशात मका आवकेत वाढ

Maize Rate : खानदेशात मका आवकेत वाढ झाली आहे. आवक वाढली असली तरी दर स्थिर आहेत. विविध बाजार समित्यांत किमान १८००, कमाल २१५० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात मका आवकेत वाढ झाली आहे. आवक वाढली असली तरी दर स्थिर आहेत. विविध बाजार समित्यांत किमान १८००, कमाल २१५० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. मक्यास पशुखाद्य उत्पादकांसह प्रक्रिया क्षेत्रातून उचल वाढल्याने दरात सुधारणा दिसत आहे.

मक्याचे दर मागील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असे होते. परंतु दरात मागील महिनाभरात सतत सुधारणा झाली असून, कमाल दरपातळी २१८० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचली आहे.

खानदेशातील मक्यास गुजरात, मध्य प्रदेशातही उचल आहे. तसेच स्थानिक भागातील पशुखाद्य उत्पादक, प्रक्रिया उद्योगातूनही मागणी आहे. मक्याची आवक सतत वाढली आहे. चोपडा येथील बाजार समितीत मागील सहा ते सात दिवसांत प्रतिदिन सरासरी २००० क्विंटल मक्याची आवक झाली.

तेथे किमान दर १८४०, कमाल दर २१५२ आणि सरासरी दर २००० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला. जळगाव येथील बाजार समितीतही मागील चार ते पाच दिवसांत प्रतिदिन सरासरी दीड हजार क्विंटल मक्याची आवक झाली आहे. जळगावातही कमाल दर २१०० रुपये प्रतिक्विंटल व सरासरी दर २००० रुपये, असे आहेत.

सध्या खानदेशातील जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबार या बाजार समित्यांत मक्याची आवक होत आहे. नंदुरबारात मक्याची आवक तुलनेत कमी आहे. कारण या भागात लागवड कमी आहे. शहादा येथील बाजारातही मक्याची आवक यंदा कमी आहे.

सध्या खानदेशातील प्रमुख चार बाजार समित्यांत मिळून सात हजार क्विंटल मक्याची आवक होत आहे. सर्वाधिक आवक चोपडा व जळगाव या बाजार समित्यांत सुरू आहे. आवकेत मागील पाच ते सहा दिवसांत वाढ झाली आहे. दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी मक्याची साठवणूक केली किंवा मळणी टाळली होती.

मका दर टिकून असल्याने अनेक खरेदीदार थेट किंवा शिवार खरेदीदेखील करीत आहेत. शिवार खरेदीत क्विंटलमागे प्रचलित दरांपेक्षा ४० ते ५० रुपये दर कमी दिला जात आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, यावल, रावेर या भागांत मक्याची लागवड अधिक झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT