Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : महाराष्ट्राची साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी

देशात डिसेंबर मध्यापर्यंत ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्राने साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी घेताना ३३ लाख टन (३३३ लाख क्विंटल) साखर उत्पादित केली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर ः देशात डिसेंबर मध्यापर्यंत ८० लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. महाराष्ट्राने साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी घेताना ३३ लाख टन (३३३ लाख क्विंटल) साखर उत्पादित केली आहे. उत्तर प्रदेशात २० लाख टन साखर तयार झाली आहे. १८ लाख टन साखरनिर्मिती करत कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.

देशात गळीत हंगाम गतीने सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ लाख टनांने उत्पादन कमी असले तरी येणाऱ्या कालावधीत हा फरक भरून निघण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ डिसेंबरअखेर यंदा दहा कारखाने जादा सुरू झाले आहेत. यंदा या कालावधीत ४८२ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. ९२३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी ८३३ लाख टन साखरेचे गाळप झाले होते. सर्वच राज्यात यंदा गेल्या वर्षीपेक्षा साखर उतारा घटल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये ०.२५ ते १ टक्क्यापर्यंत साखर उतारा घटला आहे.

यंदा ऑक्टोबर महिन्यात देशाचा गाळप हंगाम सुरू झाला असला, तरी पावसाळी परिस्थितीमुळे लवकर गती आली नाही. नोव्हेंबर महिन्यापासूनच गळीत हंगाम वेगात सुरू झाला. गेल्या पंधरा दिवसांत गाळपाने मोठी गती घेतली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक १८६ साखर कारखाने गाळप करीत आहेत.

त्या खालोखाल उत्तर प्रदेशात ११७, तर कर्नाटकात ७२ कारखाने सुरू आहेत. देशातील या पहिल्या तीन राज्यांमध्येच ८८ टक्के गाळप झाले. ७५ टक्क्यांहून अधिक साखर तयार झाली. मध्य प्रदेशात १९, तर गुजरात व पंजाबमध्ये प्रत्येकी १५ कारखाने सुरू आहेत. गेल्या वर्षी सरासरी उतारा ९.२७ टक्के होता. यंदा ८.७३ टक्के आहे. महाराष्ट्राचा सर्वाधिक उतारा ९.१० टक्के, तर आंध्र प्रदेशाचा उतारा सर्वांत कमी म्हणजे ७.५० आहे.

राज्‍याची ऊसगाळप स्थिती (१४ डिसेंबरअखेर)

विभाग---ऊसगाळप---साखर उत्पादन---साखर उतारा

(लाख टन)---(लाख क्‍विंटल)---(टक्के)

कोल्हापूर---८४.४१---८८.४८---१०.४८

पुणे---७७.४४---७०.५८---९.११

सोलापूर---९३.०३---७६.२४---८.२

नगर---४४.५१---३८.७७---८.७१

औरंगाबाद---२५.५२---२१.०१---८.२३

नांदेड---२६.४८---२३.०८---८.९९

अमरावती---२.७---२.४८---९.१९

नागपूर---०.९७---०.७---७.२२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : मुसळधारेने काही तासांत होत्याचे नव्हते

Onion Rate Crisis : कशी फुटेल कांदादर कोंडी?

Fertilizer Stock Mismatch : खत विक्री, प्रत्यक्ष साठ्यात तफावत असल्यास कारवाई

Onion Storage Rot : चाळीस टक्के कांद्याची चाळीतच नासाडी

ICAR Farmer Award : ‘आयसीएसआर’ शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणार

SCROLL FOR NEXT