Papaya Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Market : खानदेशात पपई आवक अल्प

Papaya Rate : यंदाच्या अतिउष्णतेमुळे हंगाम लांबला आहे. परिणामी आवकेवर त्याचा परिणाम दिसत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात पपई दराचा तिढा मागील हंगामात अनेकदा तयार झाला. पण यंदा प्रतिकूल स्थितीमुळे पपई आवक अल्प किंवा कमी असून, शेतकऱ्यांना जागेवर किंवा थेट खरेदीत २८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.

प्रतिकिलोचा किमान दर २५ ते २६ रुपये आहे. शेतकऱ्यांना जागेवर दर बऱ्यापैकी मिळत आहे. परंतु उत्पादन कमी किंवा हवे तसे नाही. यंदाच्या अतिउष्णतेमुळे हंगाम लांबला आहे. परिणामी आवकेवर त्याचा परिणाम दिसत आहे. पपईचा काढणी हंगाम खानदेशात ऑक्टोबरमध्ये जोमात सुरू होतो.

यंदा विषम वातावरण व इतर समस्यांमुळे उत्पादन कमी आहे. रोपांची उपलब्धता यंदा चांगली होती. यात अनेकांनी पपईची लागवड मेमध्ये किंवा उशिरा केली आहे. यामुळे आवकही कमी आहे. दुसरीकडे खरेदीदारांकडून पपईस सध्या मागणी आहे.

सणासुदीचे दिवस आहेत. पपईचा उत्पादन खर्च यंदा वाढला आहे. जागेवर ४० रुपये प्रतिकिलोचा दर हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली जात आहे. मध्यंतरी शहादा (जि. नंदुरबार) येथील पपई उत्पादकांनी खरेदीदार, व्यापाऱ्यांशी दरांबाबत चर्चा केली. परंतु दरांत फारशी किंवा ४० रुपयांपर्यंतची वाढ झालेली नाही

खानदेशातील पपईला उत्तर भारतात मोठी मागणी आहे. उठाव वाढला आहे. अशात खरेदीदारांकडून वाहने आणून कमी पक्व पपईचीदेखील खरेदी केली जात आहे. कारण पपईचा तुटवडा आहे. सध्या खानदेशात रोज १५ ते २० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

Farmer Suicide : चिंतन शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे

Soybean Procurement Issue : सोयाबीन खरेदीचा तिढा

Green Energy Investment : हरित ऊर्जेमधील गुंतवणूक २५ लाख कोटींवर जाणार

Alandi Kartiki Ekadashi : आळंदीत उद्यापासून माउलींचा संजीवन समाधी सोहळा

SCROLL FOR NEXT