Cotton Rate
Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : कापूस खरेदी टाळणाऱ्या २० खरेदीदारांचे परवाने निलंबित

टीम ॲग्रोवन

अकोट : कापूस खरेदीसाठी (Cotton Procurement) प्रसिद्ध असलेल्या अकोट बाजार समितीत (Akot APMC) तीन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांसमोर पेच तयार झाला आहे. व्यापारी व बाजार समिती प्रशासनामध्ये काही मुद्यांवरून झालेल्या वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तर आता बाजार समितीने खरेदीस नकार देणाऱ्या २० जणांचे खरेदी परवाने १५ दिवसांसाठी निलंबित केले आहेत.

व्यापाऱ्यांकडून ‘सौदापट्टी’वर हलका माल वापस’ ही टीप लिहिण्यास बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला होता. यानंतर व्यापाऱ्यांनी हर्राशी करण्यास नकार दिला. परिणामी मंगळवार (ता. ६) पासून कापूस खरेदी ठप्प आहे. त्यामुळे कायदेशीररित्या हा परवाना निलंबित केल्याची माहिती पुंडकर यांनी दिली.

‘‘ती’ टीप कायम ठेवल्यास खरेदी करू’

दरम्यान, व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. कापसाचा लिलाव झाल्यानंतर सौदा पट्टीवर ‘हलका माल परत’, असे लिहिले जात होते. ‘सीसीआय’ची खरेदी होत असताना सुद्धा सौदा पट्टीवर असे लिहिले जात होते.

परंतु, मंगळवारी (ता. ६) व्यापाऱ्यांना व बहुतांश प्रशासकांना कल्पना न देता ‘सौदा पट्टीवरील हलका माल परत’ न लिहिण्याबाबतचे आदेश मुख्य प्रशासकांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांना दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी कापसाची हर्रासी थांबवून असहकार पुकारला. सौदापट्टीवर तशी टीप कायम ठेवल्यास सर्व व्यापारी पूर्वीप्रमाणे कापसाची खरेदी करण्यास तयार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Betel Leaf : मसालावर्गीय पिकात व्हावा खाण्याच्या पानांचा समावेश

Agriculture Market : शेतकरी-ग्राहक बाजार जाचक अटींमुळे अडगळीत

Milk Production : सांगलीत दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले

Onion Market : ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची घोषणा नावापुरतीच

Urea Smuggling : अनुदानित युरियाच्या तस्करीचा संशय

SCROLL FOR NEXT