Milk Rate
Milk Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Milk Rate : गाय दुधाच्या विक्रीदरातवाढ; खरेदीदर ‘जैसे थे’

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्यातील सहकारी व खासगी दुग्ध व्यवसाय (Dairy) प्रकल्पांनी गायीच्या दूध विक्रीदरात (Cow Milk Sale Rate) प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या खरेदीदरात (Cow Milk Purchase Rate) कोणतीही वाढ न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘चितळे’, `गोकूळ’, ‘अमूल’ अशा नामांकित संस्थांनी दुधाच्या विक्रीदरात यापूर्वीच दोन रुपये वाढ केली होती. त्यामुळे सर्व खासगी डेअरी चालक आपापले दर वाढविण्यास इच्छुक होते. त्यामुळे राज्याच्या दूध उत्पादक व व्यवसाय प्रक्रिया कल्याणकारी संघाची एक तातडीची ऑनलाइन बैठक बुधवारी (ता.१७) सायंकाळी घेण्यात आली. मात्र त्यात फक्त विक्रीदराच्या वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, ‘‘खासगी किंवा सहकारी डेअरी प्रकल्पांचे आर्थिक गणित वाहतूक खर्चाशी निगडित आहे. गेल्या काही महिन्यांपासून इंधन खर्चात वाढ झाली होती. पॅकिंग खर्चही भरमसाट वाढला आहे. त्यात पुन्हा पिशवीबंद प्रत्येक दुग्धजन्य पदार्थावर जीएसटी लावला गेला आहे. यामुळे डेअरींच्या देखभाल व व्यवस्थापन खर्चात वाढले. त्यामुळेच विक्रीदरात वाढ करण्यात आली आहे.” राज्यात सध्या गाय दुधाची विक्री प्रतिलिटर ५० ते ५२ रुपये दराने सुरू होती. प्रतिलिटर दोन रुपये दरवाढ झाल्यामुळे सुधारित दर आता ५२ ते ५४ रुपये असतील.

रशिया-युक्रेन युद्धानंतर दूध व्यवसायात तेजी आली होती. त्यामुळे दुधाचे खरेदीदर ३५ रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, खासगी डेअरीचालकांनी एकत्र येत काही महिन्यांपूर्वी खरेदीदर अचानक प्रतिलिटर दोन रुपयांनी घटविले होते. काही सहकारी दूधसंघांनी या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती. दुधाचा कमी पुरवठा आणि पशुखाद्यातील तेजी कायम असतानाही खरेदीदर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होते. त्यामुळे दुधाचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मत सहकारी संघांचे आहे.

विक्रीदराचा आढावा घेण्यासाठी ऑनलाइन बैठक घेण्यात आली. खासगी नामांकित डेअरी प्रकल्पांचे संचालक तसेच सहकारी दूधसंघांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. खरेदीदरात तूर्त वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, भविष्यात खरेदीदराचादेखील आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

- गोपाळराव म्हस्के, अध्यक्ष, दूध उत्पादक व व्यवसाय प्रक्रिया कल्याणकारी संघ.

खरेदीदर वाढीस वाव

दरम्यान, शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या दुधाच्या खरेदीदरात येत्या १५-२० दिवसांनंतर वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मागणी टिकून राहिल्यास खरेदीदर किमान प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढून ३३ वरून ३५ रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे सहकारी दूध संघाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. दूध भुकटीचे दर सध्या प्रतिकिलो २८० ते २९० रुपयांपर्यंत तर लोण्याचे दर प्रतिकिलो ३८० ते ३९० रुपयांपर्यंत आहेत. “लोणी व भुकटीला दर चांगले आहेत. तसेच, दिवाळीपर्यंत राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांना चांगली मागणी राहील. दुधाच्या उत्पादनात यापुढे मोठी वाढ होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे एकूण सर्व स्थिती बघता दुधाच्या खरेदीदरात तेजी येण्यास वाव आहे,” असे सहकारी दूध संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT