Cotton Market
Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस तेजीत; देशात नरमाई

Anil Jadhao 

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कापसाचे प्रत्यक्ष खरेदी आणि वायद्यांमध्येही दरात वाढ पाहायला मिळाली. चीन आणि पाकिस्तानसह इतर देशांकडून कापसाची आयात (Cotton Import) वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसत आहे. पण देशातील बाजारात शांतता दिसली. काही ठिकाणी दरात वाढही (Cotton Rate) झाली.

मात्र अर्थसंकल्पाच्या (Union Budget) पार्श्वभुमिवर कापूस बाजारात (Cotton Market) फार घडामोडी घडताना दिसत नाहीत. पण पुढील काळात कापूस दरात वाढ होण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली.

देशातील कापूस बाजाराचं लक्ष अर्थसंकल्पाकडे आहे. कारण सुतगिरण्या आणि कापड उद्योगाने अर्थमंत्र्यांकडे कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढण्याची मागणी केली.

पण सरकार ही मागणी मान्य करण्याची शक्यताही नाही. उद्योगांनी करात सवलती तसंच सूत आणि कापड निर्यातीसाठी अनुदान देण्याचीही मागणी केली.

या मागणीला मात्र शेतकऱ्यांसह सर्वांनी पाठिंबा दिला. देशातून सूत आणि कापड निर्यात वाढल्यास कापूस दरालाही आधार मिळेल.

अर्थसंकल्पाआधी काही दिवस बाजारात फारशा घडामोडी घडत नाहीत. उद्योगांना सरकारच्या धोरणांची स्पष्टता हवी असते. एकदा अर्थसंकल्पात कर, अनुदान आदी गोष्टी स्पष्ट झाल्या की पुढील वर्षभराचा आराखडा तयार करता येतो.

त्यानुसार कापूस किंवा इतर शेतीमालाची खरेदी किंवा विक्री करता येते. त्यामुळं बाजारात उद्योगांच्या पातळीवर तशी शांतता असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

देशातील आजची दरपातळी

देशातील काही बाजारांमध्ये आज कापूस दरात किंचित वाढ दिसली. पण ही वाढ सर्वत्र दिसली नाही. आजही सरासरी दरपातळी कायम होती. पण दुसरीकडं कापूस आवक घटली.

एक लाख गाठींच्या दरम्यान कापूस आवक झाल्याचं दिसतं. तर सरासरी दरपातळी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती.

रुईचा बाजार कसा राहीला?

देशात आज एका खंडीचा भाव सरासरी ६२ हजार रुपयांवर होता. एक खंडी ३५६ किलोची असते. म्हणजेच एक क्विंटल रुईचा भाव १७ हजार ४१५ रुपये प्रतिक्विंटल होतो.

आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता, काॅटलूक ए इंडेक्स १०२ सेंट प्रतिपाऊंडवर होता. रुपयात हा दर १८ हजार ३४५ रुपये प्रतिक्विंटल होतो.

म्हणजेच देशातील प्रत्यक्ष खरेदीतील रुईचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीतील दरापेक्षा ९३० रुपयाने कमी आहेत. सीबाॅटवरील मार्च डिलेव्हरीचे वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. रुपयात रुईचा हा दर १५ हजार ४६८ रुपये प्रतिक्विंटल होतो.

दरवाढीचा अंदाज कायम

देशातील कापूस बाजाराला पुढील काळात आधार मिळण्याची शक्यता आहे. चीनकडून मागणी वाढणार आहे. तसेच पाकिस्तानमधील कापड उद्योगालाही युरोपियन मार्केटमधून कापडाला मागणी येत आहे.

त्यामुळं पाकिस्तानमधील उद्योग कापूस खरेदी वाढवण्याची शक्यता आहे. तर देशातूनही कापूस निर्यात वाढत आहे. यामुळं पुढील काही दिवसांमध्ये कापूस दरात सुधारणा होऊ शकते.

कापसाची दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : वादळी पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम

Mango Season : हापूसच्या लोकप्रियतेत रायवळ आंबा गायब

Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

Sangli DCCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेची ‘८८’अंतर्गत चौकशी सुरू

Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

SCROLL FOR NEXT