Edible Oil Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Edible Oil Import : खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करा

केंद्र सरकारनं केंद्र सरकारनं डिसेंबर २०२१ मध्ये हरभरा, मोहरी, कच्चे पामतेल, मूग, बासमती भात, गहू आणि सोयाबीन तसचं यापासून निर्मित वस्तुंच्या वायद्यांवर बंदी घातली होती.

टीम ॲग्रोवन

पुणेः देशात सध्या सोयाबीनचा हंगाम (Soybean Season) सुरु झालाय. मात्र सोयाबीन दर (Soybean Rate) सध्या दबावात आहेत. तसचं पावसामुळं पिकाचं नुकसानही (Soybean Crop Damage) वाढलंय. दुसरीकडं खाद्यतेल बाजारात (Edible Oil Market) मोठे चढ-उतार सुरु आहेत. याचा फटका शेतकऱ्यांसह उद्योगांनाही बसतोय. त्यामुळं साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने खाद्यतेलाचे वायदे सुरु करण्यासह आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारनं केंद्र सरकारनं डिसेंबर २०२१ मध्ये हरभरा, मोहरी, कच्चे पामतेल, मूग, बासमती भात, गहू आणि सोयाबीन तसचं यापासून निर्मित वस्तुंच्या वायद्यांवर बंदी घातली होती. मागीलवर्षी देशात खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळं खाद्यतेलाचे दर वाढले होते. वायद्यांमधून खाद्यतेलाचे दर वाढले, असा दावा करत केंद्रानं वायद्यांवर बंदी घातली होती.

मात्र त्यानंतरही खाद्यतेलाच्या दरातील तेजी कायम होती. मात्र आता खाद्यातेलाचे दर नरमले आहेत. तसचं वायदेबंदी असल्यानं आयातदार आणि प्रक्रियादारांना जोखीम व्यवस्थापन करता येत नाही, त्यामुळं वायदे पुन्हा सुरु करावेत, अशी मागणी साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने केली आहे.

एसईएने म्हटलंय की, आंतरराष्ट्रीय बाजारात मागील पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर नरमले आहेत. यंदा सणांच्या काळात खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळं देशातील ग्राहकांनाही दिलासा मिळतोय. बाजारात तेलबियांचे दर तेजीत होते, त्यामुळे सरकार, उद्योग आणि निर्यातदारांना काळजी होती. पण आता खाद्यतेलासोबतच तेलबियांचे दरही नरमले आहेत. सध्या सोयाबीनसह मोहरीचेही दर हमीभावापर्यंत कमी झाले. त्यामुळे सरकारवरील दबावही दूर झालाय, असंही एसईएनं म्हटलंय.

देशातील तेलबिया आणि खाद्यतेलाचे दर पाहता सरकारने सोयातेल आणि पामतेल यासारख्या आंतरराष्ट्रीय कमोडिटीचे तरी वायदे सरु करावेत. कारण खाद्यतेल बाजारात झपाट्याने चढ-उतार होत आहेत. यात प्रक्रियादार आणि आयातदारांना मोठा आर्थिक फटका बसतोय, असंही एसईएनं म्हटलंय.

तसचं देशातील तेलबिया पिकांचे दर सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करावी. सध्या शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारात दाखल होतंय. मात्र सोयाबीनचे दर दबावात आहेत. त्यामुळं सरकारने कच्चे पामतेल आणि पामोलीनच्या आयात शुल्कात किमान १० टक्क्यांची वाढ आवश्यक असल्याचंही एसईएनं म्हटलंय.

सोयाबीन आणि सोयातेलाचे वायदे सुरु झाले आणि सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यास सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. एरव्ही उद्योगांच्या दबावाला बळी पडून शेतकरी विरोधी निर्णय घेणारं सरकार आता उद्योगाच्या मागणीवरून शेतकरी हिताचा निर्णय घेईल का? हे पाहणं गरजेचं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT