Market Committee
Market Committee Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Vegetable Market : सोलापुरात गाजर, काकडीला उठाव, दरही टिकून

सुदर्शन सुतार

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur APMC) आवारात गतसप्ताहात गाजर (Carrot), काकडीला (Cucumbar) चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात रोज गाजर आणि काकडीची आवक प्रत्येकी १० ते २० क्विंटलपर्यंत राहिली.

त्यांची आवक स्थानिक भागातूनच राहिली. पण मागणीच्या तुलनेत आवक कमी राहिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना चांगला उठाव मिळतो आहे. गाजराला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये तर काकडीला किमान ८०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, कारली, कोबीचे दरही काहीसे स्थिर राहिले.

त्यांचीही आवक तशी जेमतेमच राहिली. वांग्याची रोज २० ते ३० क्विंटल, कोबीची ३० ते ४० क्विंटल आणि कारल्याची २ ते ५ क्विंटल अशी आवक राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये, कारल्याला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये तर कोबीला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

कांदा दर स्थिर


कांद्याचे दर मात्र गतसप्ताहात काहीसे स्थिर राहिले. कांद्याची आवक रोज १०० ते २०० गाड्यापर्यंत राहिली. कांद्याची सर्व आवक स्थानिक भागातूनच राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT