Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत आजचे गहू दर पाहुयात ?

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनच्या आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये पुन्हा नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १२.२६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयापेंडचे वायदेही कमी होऊन ३७६ डाॅलर प्रतिटनांवर आले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार कायम आहेत. देशातील बाजारात मात्र सोयाबीन ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशातील सोयाबीन बाजारात ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या वायद्यांमध्ये आज आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही सुधारणा दिसून आली. कापसाच्या वायद्यांनी पुन्हा एकदा ८२ सेंटच्या टप्पा पार केला होता. तर देशातील वायदे पुन्हा ५८ हजार ८०० रुपये प्रतिखंडीवर पोचले होते.

बाजार समित्यांमधील भावात काही ठिकाणी चढ उतार सुरु आहेत. तर सरासरी दरपातळी मात्र कायम होती. सरासरी दर ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा टिकून राहील्यानंतर देशातही सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

गवारचे भाव आजही टिकून होते. बाजारातील कमी आवक आणि चांगल्या उठावामुळे भाव तेजीत आहेत. इतर भाजीपाल्याच्या भावातील सुधारणेचाही फायदा गवारला मिळत आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

गवारचा भाव सध्या ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. गवारची आवक पुढील काही आठवडे कमी जास्त राहू शकते, पण गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

हरभऱ्याचा भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत. सध्या मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने हरभऱ्याच्या भावात पुन्हा एकदा सुधारणा दिसून आली आहे. हरभऱ्याचा भाव मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा ३०० रुपयांनी सुधारला.

सध्या अनेक बाजारांमध्ये हरभरा ६ हजारांवर पोचला. तर सरासरी भावपातळी सध्या ५ हजार ७०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. हरभऱ्याची ही भावापतळी आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्याससांनी व्यक्त केला. 

गव्हाचे देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारत आहेत. तर काही भागात चढ उतार दिसून येत आहे. बाजारातील आवक कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत.

देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT