Ginger Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Market : आले बियाणे दरात सुधारणा

आले पिकांच्या दरात मागील दोन महिन्यांपासून सुधारणा झाली आहे. परिणामी, आले बियाण्याच्या दरही वाढले आहे. सध्या बियाण्यास प्रति गाडी २४ ते २५ हजार रुपये दर निघाला आहे.

विकास जाधव

Ginger Market Update सातारा ः आले पिकांच्या दरात (Ginger Rate) मागील दोन महिन्यांपासून सुधारणा झाली आहे. परिणामी, आले बियाण्याच्या दरही (Ginger Seed Rate) वाढले आहे. सध्या बियाण्यास प्रति गाडी २४ ते २५ हजार रुपये दर निघाला आहे.

आले पिकांचे दर वाढतील त्याच तुलनेत बियाण्याचा दर वाढणार असल्याने आले पिकांच्या भांडवली खर्चात मोठी वाढ होणार आहे.

जिल्ह्यात आले लागवडीच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. आले लागवडीपूर्वी बियाणे ढेप लावून बंदिस्त करून सावलीत ठेवले जाते. यासाठी बियाणे एक ते दीड महिना अगोदर खरेदी करावी लागते. सध्या लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू झाली आहे. पाणी, जमीन, वातावरणातील बदल केल्यास उत्पादनात वाढ होत असते.

यासाठी आजूबाजूच्या गावातून तसेच छत्रपती संभाजीनगर येथून बियाणे आणले जातात. बियाणे निरोगी असेल तर आल्यास मूळकुजचा धोका कमी होतो.

यामुळे बियाणे खरेदी करणाऱ्या प्लॉटची प्रगतिशील शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून निरीक्षणे ठेवली जातात. मागील वर्षी आले पिकांस मोठ्या प्रमाणात मूळकुजचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आले काढून विक्री केली आहे.

यामुळे आले पिकांचे शिल्लक क्षेत्र कमी आहे. सध्या धुणीचा (खाण्यास लागणारे) आले पिकांच्या दरात सुधारणा सुरू आहे. प्रति गाडी (५०० किलो) २० ते २२ हजार रुपये दर मिळत आहे. या दराच्या तुलनेत बियाण्याचे दर तीन ते चार हजार रुपये जास्तीचा निघतो. त्यामुळे सध्या बियाण्याचे दर २४ ते २५ हजार रुपये प्रति गाडीस निघाला आहे.

आले पिकांचे दर वाढत असल्यामुळे बियाण्यास मागणीत वाढ होत आहे. परिमाणी, बियाण्याचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बियाण्याचा दरात वाढ झाल्याने भांडवलातही वाढ होणार आहे. याचा परिणाम आले पिकांच्या क्षेत्रावरही होणार आहे.

मागील चार ते पाच वर्षात आले पिकांच्या दराने नीचांकी गाठल्याने आले पिकांच्या क्षेत्रात ३० टक्के घट झाली होती. या वर्षी मात्र ही परिस्थिती बदल असून, सरासरी इतके क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या

पुढील काळात दर वाढतील या आशेवर या हंगामात आले पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार असल्याने आले बियाण्याची मागणी वाढणार आहे.

बियाण्याच्या मागणीमुळे मूळकुच झालेले आले पीक विकले जाणार असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होणार आहे. यामुळे बियाण्याची प्रत्यक्ष पाहणी केलेले बियाणे खरेदी करण्याची सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

व्यापाऱ्यांचा अव्वाच्या सव्वा दर

काही व्यापारी शेतकऱ्यांकडून बियाण्यांची खरेदी करून स्वतः विक्री करत आहेत. याचा परिणाम दरावर होत आहे. जास्तीचे पैसे मिळावे यासाठी व्यापाऱ्यांकडून बियाण्याचे अव्वाच्या सव्वा दराचे आकडे काढले जात आहेत.

याचा फायदा आले उत्पादक शेतकऱ्यांना होत नसून, नव्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यामुळे बियाणे व्यापाऱ्यांकडून खरेदी न करता थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केले जावे.

आले बियाण्याचे दर वाढ होत असल्याने बियाण्याची मागणी वाढली आहे. धुण्याच्या आल्याचे दरात वाढ झाली की बियाण्याच्या दरात वाढ होणार आले. पुढील काळात आले बियाण्याचे दर वाढण्याचा अंदाज आहे.

- पृथ्वीराज देशमुख, गोपूज, जि. सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Self-Reliance: राज्यात कडधान्य आत्मनिर्भरता अभियान- शेतकऱ्यांना बियाणे, काढणी पश्चात सुविधांसाठी १६७ कोटी

Mosambi Farming: अभ्यासू, अनुभवसंपन्न अशी जाधव यांची प्रयोगशील शेती

Naxalism and Social Inequality: नक्षलवाद संपला, विचार संपेल काय?

Indian Economy: नियोजनशून्य कारभाराचा कळस

CBG Policy 2026: ‘सीबीजी’ धोरणातून हरित ऊर्जेची झेप

SCROLL FOR NEXT