Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market: कापूस दरातील सुधारणा कायम; वायद्यांमध्येही चांगली वाढ

Cotton Market Rate : देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील वाढ आजही कायम होती. काही भागात चढ उतारही पाहायला मिळाले. तसेच वायद्यांमध्येही भावपातळी स्थिर दिसत नाही.

Team Agrowon

Pune News : देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील वाढ आजही कायम होती. काही भागात चढ उतारही पाहायला मिळाले. तसेच वायद्यांमध्येही भावपातळी स्थिर दिसत नाही. तर दुसरीकडे बाजारातील आवक दरवाढीनंतर कमी झाली आहे. कापसाला उठाव वाढत असल्याने ऑगस्ट महिन्यातही दरातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारातही काहीसे चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत ऑक्टोबरचे वायदे ९० सेंट प्रतिपाऊंडवर होते. काल वायदे ९०.३३ सेंटपर्यंत वाढले होते. पण शेवटी बाजार ८९.४३ सेंटवर बंद झाला होता. आजही कापूस दरात चढ उतार दिसले. काल बाजार बंद झाला त्यातुलनेत आज भावपातळी जास्त होती. तर डिसेंबरचे वायदेही ८८.१० सेंटवरून आज जवळपास सव्वा टक्क्याने नरमले होते. आज दुपारी डिसेबरचे वायदे ८६.८० सेंट प्रतिपाऊंडवर होते.

देशातील बाजारात कापसाचे भाव काहीसे वाढले आहेत. दरात आज काहीसे चढ उतार दिसले. पण भावपातळी घटली नव्हती. देशातील कापूस भाव आज कालच्या पातळीदरम्यानच दिसले. देशातील वायद्यांमध्येही कालच्या दरापेक्षा आज काहीशी नरमाई दिसली.

काल कापूस वायद्यांनी ६० हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र बाजार बंद होताना त्यात नरमाई दिसू आली. तर कापूस वायद्यांनी आज दुपारी ५९ हजार ६८० रुपये प्रतिखंडीचा टप्पा गाठला होता. कापूस वायद्यांमध्ये आजही काहीसे चढ उतार दिसून आले.

बाजार समित्यांमध्येही दरात आज काही ठिकाणी वाढ तर काही भागात घट दिसून आली. पण सरासरी दरपातळी कालच्या भावादरम्यान कायम होती. बाजार समित्यांमध्ये आज कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळाला. कापसाच्या भावात वाढ झाली तरी आवकेत फारशी वाढ झाली नाही, असे व्यापारी सांगत आहेत.

बाजारात आजही कापसाची आवक काहीशी कमी दिसली. पावसामुळे शेतकरी कापूस विकत असून पुढील काही दिवसांमध्ये आवक आणखी घटेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. ऑगस्टपासून सणांमुळे कापसाला चांगली मागणी राहू शकते. त्यामुळे कापसाच्या दरात चांगली वाढ दिसू शकते. पण चढ उतारही राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather: राज्यात किमान तापमानात वाढ; उकाड्यातही झाली वाढ 

Rabi Sowing Update: बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणी ३० टक्क्यांवर

Onion Farming: रब्बी कांद्याची आंतरमशागत कधी करावी? तणांचा बंदोबस्त कसा कराल?

Shaktipeeth Highway Protest: सांगलीच्या खानापूरमध्ये 'शक्तिपीठ' विरोधात संघर्ष तीव्र, शेतकऱ्यांनी हातात दगड घेतले, महिलाही संतप्त, मोजणी उधळली

Farm Road Development Work: तहसीलदारांच्या पाठीवर महसूल मंत्र्यांकडून कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT