Sugar Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Brazil Sugar Industry : आंतरराष्ट्रीय बाजारावर ब्राझीलच्या साखरेचा परिणाम

Sugar Market : ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात वाढ होत असल्याने याचा परिणाम जागतिक बाजारावर होत आहे. ब्राझीलची साखर जागतिक बाजारपेठेत जाण्यास प्रारंभ झाला आहे.

Raj Chougule

Kolhapur News : ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात वाढ होत असल्याने याचा परिणाम जागतिक बाजारावर होत आहे. ब्राझीलची साखर जागतिक बाजारपेठेत जाण्यास प्रारंभ झाला आहे. याचा परिणाम बाजारपेठेतील दर घसरणीवर झाला आहे.

एक महिन्यापासून सातत्याने वाढणाऱ्या दरात घट झाल्याचे चित्र जागतिक बाजारात आहे. शुक्रवारी (ता. २) लंडन साखर बाजारात साखरेचा दर ६८७ डॉलर प्रतिटन इतका खाली आला. हाच दर मे महिन्याच्या मध्याला ७१० डॉलरपर्यंत गेला होता.

ब्राझीलच्या साखर उद्योगातील संस्था ‘युनिका’ने दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत साखरेचे उत्पादन पहिल्या दोन महिन्यांमध्ये वाढले आहे.

मे अखेरपर्यंत ४० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगामाच्या प्रारंभी पहिल्या दोन महिन्यात ३८ लाख टन साखर तयार होईल, याचा अंदाज होता. या अंदाजामध्ये काहीशी वाढ झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या ब्राझीलच्या ऊस हंगामाने यंदा मात्र दमदार सुरुवात केली आहे. एकीकडे भारताच्या साखर उत्पादनात घट होत असताना ब्राझीलचे साखर उत्पादन मात्र पहिल्या टप्प्यात तरी वाढल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची चणचण असल्याने किमती गगनाला भिडल्या होत्या. गेल्या वर्षीचा प्रमुख पुरवठादार असणाऱ्या भारतामध्येही यंदा फारशी समाधानकारक स्थिती नसल्याने साखरेची चणचण बसत होती.

साधारणपणे एप्रिलच्या मध्याला ब्राझीलचा साखर हंगाम सुरू झाला. मे च्या मध्यापर्यंत ब्राझीलची साखर जागतिक बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. साखरेची आवक होत असल्याचे लक्षात येताच उच्चांकी पातळीवर पोहोचलेले साखरेचे दर काहीसे नरमले. सध्या गेल्या १५ दिवसांच्या तुलनेत साखरेच्या बाजारात घसरण होत असली तरी अजूनही दर चांगले असल्याने याचा फायदा ब्राझीलच्या साखरेला होईल, अशी शक्यता आहे.

भारताचे ग्राहक देश ब्राझीलकडे वळले

गेल्या वर्षी भारताकडून साखर मागणी केलेले बहुतांश देश यंदाच्या वर्षी मात्र ब्राझीलकडे वळत आहेत. त्यामुळे ब्राझीलला यंदा चांगला दर मिळेल, अशी शक्यता आहे. भारतातून साखर निर्यातीला परवानगी मिळेल, ही शक्यता जवळजवळ संपली आहे. यामुळे आता भारतीय साखर उद्योगाला जागतिक बाजारातील दराचा कोणताच फायदा होणार नाही, हे निश्चित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nilesh Lanke Demands: अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कारभारा विरोधात नीलेश लंकेंचे आंदोलन

Sugarcane Crushing Update: सातारा जिल्ह्यात २५ लाख टन उसाचे गाळप पूर्ण

Animal Crematorium: पशूंच्या स्मशानभूमीचा शासननिर्णय कागदावरच!

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या एक हजार जादा बसेसची व्यवस्था- मंत्री प्रताप सरनाईक

Crop Damage Compensation: पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

SCROLL FOR NEXT