Raisin Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Market : बेदाण्याच्या दरात पुन्हा तेजी; १५ दिवसांत २० रुपयांची वाढ

Market Update : सांगली, तासगाव आणि पंढरपूर या बाजारपेठांत बेदाण्याची आवक मंदावली असून मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात पुन्हा तेजी आली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : सांगली, तासगाव आणि पंढरपूर या बाजारपेठांत बेदाण्याची आवक मंदावली असून मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर प्रति किलोस २० रुपयांनी वाढले आहेत. बेदाण्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

गत वर्षी राज्यात बेदाण्याचे तीन लाख उत्पादन झाले होते. सध्या राज्यात अंदाजे २५ ते ३० हजार टन बेदाणा शिल्लक आहे, असा अंदाज बेदाणा व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या तिन्ही बाजार समितींत सौद्यात सरासरी दीड ते दोन हजार टन आवक होत आहे. त्यापैकी पन्नास टक्के बेदाण्याची विक्री होत आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर अर्थात शून्य पेमेंट पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सौदे सुरू झाले. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बेदाण्याच्या दरात प्रति किलोस वीस रुपयांनी दर वाढले होते. यादरम्यान, बेदाण्याला दर्जानुसार प्रति किलोस १२० ते २२५ रुपये असा दर होता. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समितीत बेदाण्याची मागणी आहे. मात्र गतवर्षीचा बेदाणा कमी राहिला आहे. त्यामुळे बेदाण्याची मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. परिणामी, बाजारात बेदाण्याची आवक मंदावली असल्याने दरात वाढ झाली आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी बेदाणा विक्रीसाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर पुन्हा बेदाण्याचे दर प्रति किलोस २० रुपयांनी वाढले. अर्थात, एका महिन्यात दोन वेळा दर वाढले. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दर वाढण्याची शक्यता

शेतकरी वर्षभर बेदाणा विक्रीचे नियोजन करतो. गेल्या वर्षभर बेदाण्याचे दर टिकून राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री केली. सध्या २५ ते ३० हजार टन बेदाणा शिल्लक असल्याने विक्रीसाठी बेदाणा कमी पडू लागला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन बेदाणा येईपर्यंत हा बेदाणा पुरवठा येईल. वाढत्या मागणीमुळे बेदाण्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

बेदाण्याची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने दर चांगले मिळत आहेत. येत्या काळातही बेदाण्याचे दर चांगले राहतील. यंदाच्या हंगामातील नवीन बेदाणा मार्चमध्ये विक्रिला येईल.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

बेदाणा दर (प्रति किलो)

हिरवा....१४५ ते २४०

काळा....४० ते १००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bogus Onion Seed: बोगस कांदा बियाण्यांचा फटका; शेतकऱ्यांची पोलिसांत धाव

Indian Politics: मौनं सर्वार्थ साधनम् !

Dairy Farming Success : दुग्ध व्यवसायातून गवसला खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग

Maharashtra Unseasonal Rains: राज्यातील अनेक भागांत 'अवकाळी'चा तडाखा! भात पीक कापणी थांबली, साखर हंगाम लांबणीवर पडणार?

Maize Market : मका आयात आत्मघातकी ठरेल

SCROLL FOR NEXT