Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Hapus Mango Rate : हापूसच्या चार-पाच डझनांच्या पेटीला दोन हजार रुपयांपर्यंत दर

Mango Market : या वर्षी हापूस हंगाम जानेवारीच्या अखेरीपासून धीम्या गतीने सुरू झाला. त्यानंतर फेब्रुवारीअखेरपर्यंत हंगामाची स्थिती ‘जैसे थे’ राहिली.

एकनाथ पवार

Sindhudurg News : हापूस आंबा दरात मोठी घसरण झाली असून दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत चार ते पाच डझनाच्या पेटीला दर मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेत देखील आंब्यांची आवक वाढल्याने प्रति डझन तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत आंबा मिळत आहे.

या वर्षी हापूस हंगाम जानेवारीच्या अखेरीपासून धीम्या गतीने सुरू झाला. त्यानंतर फेब्रुवारीअखेरपर्यंत हंगामाची स्थिती ‘जैसे थे’ राहिली. आवक कमी राहिल्यामुळे हापूसच्या चार-पाच डझनांच्या पेटीचा दर ६ हजार ते ८ हजार रुपयांपर्यंत होता. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आंब्याची आवक वाढली. मात्र तरीदेखील दरात फारशी घसरण झाली नाही.

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून तापमानवाढीचा मोठा परिणाम आंबा पिकावर होऊ लागला. आतापर्यंत परिपक्व होण्यास विलंब होत असलेला आंबा झपाट्याने परिपक्व होऊ लागला. मार्चअखेर आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हापूसची आवक एकाच वेळी मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा परिणाम हापूसच्या दरावर झाला.

महिना दीड महिना सहा हजार रुपयांना मिळणाऱ्या पेटीचा दर सध्या दोन हजारांपर्यंत खाली आला आहे. स्थानिक बाजारपेठेत देखील आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे १ हजार ते १२०० रुपयांना मिळणाऱ्या आंब्याचा दर आता ३०० ते ५०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

हापूसबरोबरच गोवा मानखुर्द, केसर आंबादेखील बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे. याशिवाय पूर्वपट्ट्यातील काही आंबा परिपक्व होण्यास प्रारंभ झाल्यामुळे आंब्याच्या दरात घसरण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: जानेफळ येथे शेतकरी कंपनीच्या केंद्रावर सोयाबीन खरेदीला सुरुवात

Leopard Attack: वडिलांच्या प्रसंगावधानाने बिबट्याच्या हल्ल्यातून मुलाची सुटका

Agriculture Field Visit: ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ उपक्रमाअंतर्गंत प्रक्षेत्रभेटी

Agriculture Loan: ‘ॲग्रिकल्चर इज बेस्ट कल्चर’ शिबिराद्वारे एकूण २६ कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर

OTP Verification: ओटीपी प्रमाणीकरण मान्य करा

SCROLL FOR NEXT