Mango Season Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Season : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूसची आवक वाढली

Hapus Mango Rate : देवगडमध्ये मात्र आंब्याचा दर अजूनही प्रतिडझन ५०० रुपयांवर स्थिर आहे. जिल्ह्यात महिना-दीड महिना हापूस आंब्याचे दर स्थिर होते.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्याच्या विविध स्थानिक बाजारपेठांमध्ये सध्या हापूस आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घट झाली असून सावंतवाडी, कुडाळ या बाजारपेठांमध्ये प्रतिडझन ३०० ते ४०० रुपये दराने आंबाविक्री केली जात आहे. देवगडमध्ये मात्र आंब्याचा दर अजूनही प्रतिडझन ५०० रुपयांवर स्थिर आहे.

जिल्ह्यात महिना-दीड महिना हापूस आंब्याचे दर स्थिर होते. आतापर्यंत देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांतील आंबा वाशीसह राज्याच्या विविध बाजारपेठांमध्ये विक्रीकरिता जात होता. उत्पादन देखील कमी होते. परंतु एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नियमित हापूस बाजारपेठेत दाखल होण्यास सुरुवात झाली.

त्यामुळे विविध स्थानिक बाजारपेठांमध्ये हापूस विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागला आहे. सुरुवातीला आंब्याचे दर प्रतिडझन ५०० ते १००० रुपयांपर्यंत टिकून होते. परंतु गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या उर्वरित भागांतील आंबा हंगामाला सुरुवात झाली आहे.

सावंतवाडी, कुडाळ या भागांतील आंबा बाजारपेठेत दाखल झाला आहे. त्यामुळे सध्या या बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दरात घट होऊन आंबा प्रतिडझन ३०० ते ४०० रुपयांनी ग्राहकांना उपलब्ध होऊ लागला आहे.

कणकवलीत देखील आंब्याचे दर काही प्रमाणात घटले आहेत. असे असले तरी देवगडमध्ये मात्र हापूसचे दर कायम आहेत. या भागामध्ये अद्याप आंब्याची प्रतिडझन ५०० रुपयांनी विक्री सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT