Soybean Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदीत खोळंबा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Soybean Market : सोयाबीनला बाजारपेठेत दर नसल्याने शेतकरी शासकीय खरेदीकडे यंदा वळाले आहेत. मात्र, गेल्या आठवडाभरापासून बहुतांश खरेदी केंद्रांना बारदान्याची चणचण भासते आहे. काही केंद्रांवरील खरेदी यामुळे ठप्प पडलेली आहे.

 गोपाल हागे

Akola News : सोयाबीनला बाजारपेठेत दर नसल्याने शेतकरी शासकीय खरेदीकडे यंदा वळाले आहेत. मात्र, गेल्या आठवडाभरापासून बहुतांश खरेदी केंद्रांना बारदान्याची चणचण भासते आहे. काही केंद्रांवरील खरेदी यामुळे ठप्प पडलेली आहे.

प्रामुख्याने शासकीय यंत्रणेच्या अखत्यारीत सुरू असलेल्या केंद्रांना बारदाना मिळत नसल्याने ओरड असून पणन विभागाने ज्वारीसाठी वापरलेला जुना बारदाना देत खरेदी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या जुन्या बारदान्यात शेतीमाल स्वीकारण्यास वखार महामंडळाकडून नकार येत असल्याचे खरेदीदार केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे.

बाजारात सोयाबीन हमीभावापेक्षा (४८९२) सुमारे हजार रुपयांनी कमी विकते. अकोलासारख्या मोठ्या बाजारात सोयाबीनला किमान ३७०० व कमाल ४३४५ रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. सरासरी ४०७५ रुपयांचा हा दर आहे. अशा स्थितीत हजारो शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्रांवर नावनोंदणी केली आहे.

आतापर्यंत राज्यात सुमारे सहा लाखांवर सोयाबीन उत्पादकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ २५ टक्क्यांपर्यंत म्हणजेच एक लाख ६० हजार शेतकऱ्यांचाच शेतमाल नाफेड व एनसीसीएफच्या केंद्रांवर मोजला गेला. यात नाफेडने सर्वाधिक २४ लाख ५८ हजार ३५५ क्विंटल,

तर ‘एनसीसीएफ’च्या (नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया) केंद्रावर ८ लाख २१ हजार ९४१ क्विंटल सोयाबीन खरेदी झालेले आहे. दोन्‍ही खरेदीदार एजन्सींजच्या केंद्रावर एकूण ३२ लाख ८० हजार क्विंटलपर्यंत सोयाबीन मोजले गेले. राज्यात सोयाबीनची मोठी खरेदी बाकी आहे. अशा स्थितीत यंत्रणांकडून वेळेत बारदाना पोहोचवला जात नसल्याने स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागले आहे.

बारदाना पुरवठ्यात दुजाभाव

मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत खरेदी केंद्र असलेल्या ठिकाणी बारदाण्याची चणचण नेहमीच भासते. खासगी एजन्सीच्या केंद्रावर सुरळीत पुरवठा व तेथे खरेदीही सुरू असते. बारदाणा पुरवठ्यात दुजाभाव होत असल्याची भावना खरेदी केंद्र चालकांमध्ये वाढत असल्याचे एका जबाबदार केंद्र चालकाने सांगितले. या संदर्भात जुन्या बारदान्यात सोयाबीन स्वीकारण्यास वखार महामंडळाच्या गोदामस्थळी नकार दिला जातो, यामुळे गोची तयार झाल्याचेही सांगण्यात आले.

सोयाबीन विक्रीसाठी महिनाभरापूर्वी नावनोंदणी केलेली आहे. यंदा एकरी सहा क्विंटलपर्यंत उतारा लागलेला आहे. बाजारात दर नसल्याने शासकीय खरेदी केंद्रावर माल विकायचा आहे. माझ्याकडे ६० ते ६२ क्विंटल सोयाबीन सध्या विक्रीसाठी पडून आहे. मात्र, बारदाना नसल्याने आठ दिवसांपासून केंद्र बंद पडलेले आहे.
राजू काळे, शेतकरी, उटी, ता. मेहकर , जि. बुलडाणा

नाफेडच्या सोयाबीन खरेदीची स्थिती
खरेदी संस्था सुरू असलेली केंद्रे नोंदणीकृत शेतकरी खरेदी
मार्केट फेडरेशन २०७ २६०२१३ १३०७४४४ क्विंटल
व्हीसीएमएफ ५३ ७६२४७ ३५७३६४
पृथाशक्ती ६३ ५८४५६ ३९२२९६
महाकिसान संघ ४८ ५५८९१ २३३१३३३
महाकिसान वृद्धी ३१ २७७८४ १६८११७
एकूण ४०२ ४७८५९१ २४ लाख ५८ हजार ३५५ क्विंटल

‘एनसीसीएफ’च्या खरेदीची स्थिती
एकूण १५९ १५४४९० ८ लाख २१ हजार ९४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Post Monsoon Rain: मॉन्सूनोत्तर पाऊसही सरासरीपेक्षा अधिक

Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

SCROLL FOR NEXT