Soybean Procurement : किंमत आधार योजनेत १ लाख २० हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

Soybean Market : परभणी व हिंगोली जिल्ह्यात किंमत आधार योजना २०२४-२५ अंतर्गंत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) शुक्रवार (ता. २०) एकूण २५ केंद्रांवर ६ हजार २१८ शेतकऱ्यांचे १ लाख २० हजार ८७५ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.
Soybean, Chana Futures Ban
Soybean, Chana Futures BanAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी ः परभणी व हिंगोली जिल्ह्यात किंमत आधार योजना २०२४-२५ अंतर्गंत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) शुक्रवार (ता. २०) एकूण २५ केंद्रांवर ६ हजार २१८ शेतकऱ्यांचे १ लाख २० हजार ८७५ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. या सोयाबीनची किंमत ५९ कोटी १३ लाख रुपयावर होते.आजवर २४ केंद्रावरील ३ हजार ८३ शेतकऱ्यांना ६३ हजार ४६४ क्विंटल सोयाबीनचे ३१ कोटी १९ लाख ३८ हजार रुपये चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

या सोयाबीनची किंमत ५९ कोटी १३ लाख रुपयावर होते.आजवर २४ केंद्रावरील ३ हजार ८३ शेतकऱ्यांना ६३ हजार ४६४ क्विंटल सोयाबीनचे ३१ कोटी १९ लाख ३८ हजार रुपये चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

Soybean, Chana Futures Ban
Soybean Procurement : हमीभावाने २ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) अंतर्गंतच्या १२ खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी १४ हजार १२० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी पर्यंत १० खरेदी केंद्रावर २ हजार ३६१ शेतकऱ्यांचे ४३ हजार २५८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. या सोयाबीनची किंमत २१ कोटी १६ लाख २१ हजार ७९० रुपये होते.

आजवर १० केंद्रांवरील १ हजार ४१२ शेतकऱ्यांच्या २५ हजार ४०८ क्विंटल सोयाबीनचे १२ कोटी ४२ लाख ९९ हजार ३११ रुपये चुकारे अदा करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) अंतर्गतच्या १५ खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता. २०) पर्यंत १४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सर्व १५ केंद्रांवर मिळून एकूण ३ हजार ८५७ शेतकऱ्यांचे ७७ हजार ६१७ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. या सोयाबीनची किंमत ३७ कोटी ९७ लाख ५ हजार ९३५ रुपये होते. आजवर १४ केंद्रावरील १ हजार ६७१ शेतकऱ्यांना ३८ हजार ३५६ क्विंटल सोयाबीनचे १८ कोटी ७६ लाख ३९ हजार ९४९ रुपये चुकारे अदा करण्यात आले.

परभणी-हिंगोली जिल्हे किंमत आधार योजना सोयाबीन खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण नोंदणीकृत शेतकरी सोयाबीन खरेदी शेतकरी संख्या

परभणी ७७० ४६२४ २२२

पेडगाव ११२० ४७८२ २७३

झरी ९३ ०० ००

वरपुड १६४ ०० ००

बोरी १७४४ ४२५८ २२९

जिंतूर ८४८ १८५८ १२३

सेलू ३२१४ ११३४४ ६८३

मानवत १८८४ २२६४ १३३

रुढीपाटी ३४९ ८८५ ४३

पाथरी १२८० ३२६२ १७१

सोनपेठ १५०५ ५०९५ २२९

पूर्णा ११४९ ४८८३ २५५

हिंगोली ७६८ ४१४५ १७६

कन्हेरगाव १०९४ ९५५६ ३८४

कळमनुरी १३९२ ५०६६ २८९

वारंगा ११०० ४२३३ २३४

वसमत १३२९ ४९४६ ३००

जवळा बाजार १८१३ ६७६७ ४२७

येळेगाव ८१३ ४१०१ २१६

सेनगाव १०४२ १०८३२ ४७१

साखरा ८०४ ३९८९ १८७

शिवणी खुर्द ९७५ २७९३ १६४

फाळेगाव १०३९ ६८१५ ३३६

नागसिनगी ८३८ ६५०६ २७८

आडगाव ५७२ ३६९८ १९७

उमरा २५८ ४४५..२४

पुसेगाव ८२२ ३२२१ १७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com