Gujrat Tur Chana Market News Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement : गुजरात हमीभावाने तूर, हरभरा खरेदी करणार

गुजरात सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची तूर, हरभरा आणि मोहरी खरेदीचे वेळापत्रक जाहीर केले. १ फेब्रुवारीला नोंदणी सुरू होणार असून १० मार्चपासून खेरदी सुरू होणार आहे.

Team Agrowon

पुणे ः गुजरात सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची तूर, हरभरा (Chana Tur) आणि मोहरी खरेदीचे (Mustard Procurement) वेळापत्रक जाहीर केले. १ फेब्रुवारीला नोंदणी सुरू होणार असून १० मार्चपासून खेरदी (MSP Procurement) सुरू होणार आहे. गुजरात सरकार आता हमीभावाने खरेदीत उतरले आहेत. त्यामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

गुजरात राज्याचे कृषिमंत्री राघवजी पटेल यांनी याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांकडून तूर, हरभरा आणि मोहरी खरेदीचा निर्णय राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले. आपला माल विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी एक महिन्याची मुदत असून १ फेब्रुवारीपासून नोंदणीला प्रारंभ होणार आहे.

गुजरात सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माल हाती येण्याच्या काळातच प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष तूर, हरभरा आणि मोहरीची खरेदी खरेदी १० मार्चपासून सुरू होईल. खरेदीची प्रक्रिया ९० दिवस चालेल. रोज ६२५ क्विंटलच्या दरम्यान खरेदी केली जाणार आहे.

शेतकऱ्यांकडून खरेदीसाठी केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. गुजरातमध्ये १३५ केंद्रांवर तुरीची खरेदी जाणार आहे. तर हरभऱ्याची खरेदी १८७ केंद्रांवर केली जाईल. मोहरीसाठी १०३ केंद्र सुरू करण्यात येतील. केंद्राने यंदा तुरीसाठी ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. तर हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये आणि मोहरीसाठी ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहीर केला.

खुल्या बाजारात तूर, मोहरीचे दर अधिक

खुल्या बाजारात तूर आणि मोहरीला सध्या हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे. तर हरभऱ्याचे दर मागील वर्षभरापासून हमीभावापेक्षा कमीच आहेत. सध्या गुजरातमधील बाजारात तुरीला ५ हजार ५०० ते ७४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. राजकोट बाजारात तुरीची सरासरी १ हजार २०० क्विंटल आवक झाली होती. तसेच मोहरीचे दर ५६०० रुपये प्रतिक्विंटल होते. तर हरभऱ्याला केवळ ४६३० ते ४७२५ रुपये दर मिळत आहे.

उत्पादन वाढण्याचा अंदाज

गुजरात तूर, हरभरा आणि मोहरी उत्पादनात महत्त्वाचे राज्य आहे. यंदा गुजरातमध्ये या शेतीमालांचे उत्पादन वाढेल, असा अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला. गुजरातने यंदा तुरीचे उत्पादन २ लाख ९१ हजार टनांवर पोहोचेल, असा अंदाज जाहीर केला. तर हरभरा उत्पादन १५ लाख ५० हजार टनांवर स्थिरावेल. तर मोहरी उत्पादन ६ लाख ३९ लाख टनांचा टप्पा गाठेल, असा अंदाज गुजरात सरकारने व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Husbandry: पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा

Strawberry Cultivation: शेतकरी घेणार स्ट्रॉबेरी लागवडीची माहिती

Cotton Cultivation: आधुनिक सघन कापूस लागवड तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. काळे

Winter Wheat Management: हिवाळ्यात गहू पिवळा पडतोय? जाणून घ्या उपाययोजना

Devendra Fadnavis: मुंबईकरांना सेवेकरी हवेत, राज्य गाजवणारे नकोत, ठाकरेंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT