Grape Farming  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Grape Market : दर वाढल्याने द्राक्ष बागा राखण्याची वेळ

Grape Rate : द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तर उत्पादनात ४० टक्के घट असल्याने बाजारात मागणी असल्याने दरात सुधारणा आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तर उत्पादनात ४० टक्के घट असल्याने बाजारात मागणी असल्याने दरात सुधारणा आहे. अशा परिस्थितीत भुरट्या चोरांची नजर द्राक्षबागांवर आहे. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन भुरटे चोर संधी साधत आहे. या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी धास्तावले असून द्राक्षबागा राखण्याची वेळ आली आहे.

यंदा माल कमी असल्याने व्यापाऱ्यांकडून मागणी वाढली आहे. स्थानिक व निर्यात अशा बाजारपेठांमध्ये गुणवत्तेनुसार चांगले दर मिळत आहेत. गुणवत्तेनुसार सफेद द्राक्षबागांना प्रति किलो ६० ते ९० रुपयांपर्यंत तर रंगीत वाणाला ९० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. एकीकडे मिळणाऱ्या दरामुळे शेतकरी समाधानी आहेत. मात्र अशा परिस्थितीत चोरांची नजर द्राक्ष बागांवर पडली आहे.

काही ठिकाणी परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे प्रकार समोर आले. तर आता द्राक्षाच्या दरात सुधारणा असताना काही भुरटे चोर बागांमध्ये रात्रीच्या वेळी द्राक्ष माल तोडून चोरी करत असल्याचे समोर येत आहे. शेतकरी सकाळी बागेत गेल्यानंतर गल्ल्यांमध्ये वेलींवर घड कमी झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे उत्पादन कमी त्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी द्राक्ष बागांवर डोळा ठेवल्याने द्राक्ष उत्पादकांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे.

निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथे द्राक्ष बागेतून ४ ते ५ क्विंटल द्राक्षांची चोरी झाली होती. तर मध्यरात्री द्राक्ष घड ओरबडून गोणीमध्ये भरून नेताना चोराला शिरवाडे वणी येथे रंगेहाथ पकडून शेतकऱ्यांनी चोप दिला होता. एकीकडे बिबट्यांचे हल्ले वाढत असताना दुसरीकडे काही ठिकाणी जीव धोक्यात घालून बागांमध्ये रात्री चकरा शेतकऱ्यांना माराव्या लागत आहेत.

चोरीनंतर किरकोळ विक्रेत्यांना विक्री

शिरवाडे वणी शिवारात शेतकऱ्यांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले. त्यातील एक फरार झाला होता. तर एकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. हा चोरलेला द्राक्ष माल किरकोळ विक्रेत्यांना विक्री करत असल्याची कबुली त्या चोरट्याने दिली. सारोळे खुर्द, शिरवाडे वणी, पिंपळगाव बसवंत, पालखेड मिरचीचे या गावांत द्राक्ष चोरी झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा द्राक्ष हंगाम अडचणीत होता. तरीही प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादन घेतले. बागा काढणीला असून मालाला मागणी असल्याने दर चांगले आहेत. मात्र चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वर्षभर कष्ट करून आता बागांना राखण थांबावं लागत आहे. दोन ठिकाणी बागा आहेत, रात्री बिबट्या कधी नजरेस दिसून येतो तरीही गस्त घालावी लागते.
- किशोर निफाडे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, शिरवाडे वणी, ता. निफाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात घसरण, हरभरा दरात चढ-उतार, पालक दर स्थिर, फ्लॉवर दर टिकून तर पपईच्या आवकेत घट

Kharif Sowing: परभणी, हिंगोलीत तूर, मूग, उडीदाची ७० हजार हेक्टर पेरणी

Vidarbha Orange Farming : संत्रा ठरेल विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा आधार

Flood Control Project: कोल्हापूर- सांगलीचा पूरप्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पूर्ण, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत शेतकऱ्यांच्या नावासमोर अर्धवट रक्कम; कोणते कर्ज माफ केले? आमदार कैलास पाटील यांचा सवाल

SCROLL FOR NEXT