Pune News: तुरीचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. मात्र सरकारने आता राज्यात तूर खरेदीचे उद्दीष्ट जाहीर करून खरेदी सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात २ लाख ९७ हजार टन तूर खरेदीचे उद्दीष्ट देण्यात आले. तर नोंदणीची प्रक्रिया २४ जानेवारीपासून सुरु करण्यात आली आहे तर १३ फेब्रुवारीपासून खरेदीही सुरु करण्याच्या सूचना सरकारने संबंधित संस्थांना दिल्या आहेत. तसेच जिल्हानिहाय उत्पादकता निश्चित करून खरेदीची मर्यादा नेमून देण्यात आली आहे.
तुरीचा बाजारभाव आपल्या उच्चांकी दरापासून निम्मा झाला. तुरीने मागील काही महिन्यांमध्ये १२ हजारांचाही टप्पा पार केला होता. मात्र सध्या बाजारात तूर सरासरी ७ हजाराने विकली जात आहे. नवी तूर बाजारात दाखल झाल्यानंतर दरावर आणखी दबाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे भाव आणखी पडतील, याची भीती शेतकऱ्यांना होती.
त्यासाठी सरकारने तातडीने हमीभावाने खरेदी सुरु करण्याची मागणी शेतकरी करत होते. शेजारच्या कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत आधीच ३ लाख ६ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट जाहीर केले होते. तसेच शेतकऱ्यांना क्विंटलमागे ४५० रुपये बोनसही जाहीर केला होता.
सरकारने यंदा तुरीसाठी ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या बाजारात ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तसेच सोयाबीनची खरेदी महाराष्ट्रात लांबल्याने तुरीची खरेदीही लांबत आहे. महाराष्ट्रात खरेदी जाहीर करण्यासच उशीर झाला. तसेच सध्या गोदामांची समस्या असल्याचे खेरदी केंद्र चालक सांगत आहेत. सोयाबीन ठेवायलाही जागा नाही. सोयाबीनच्या खरेदी केंद्राबाहेर अनेक दिवस वाहने थांबून आहेत. त्यातच आता तूर खरेदी सुरु झाली. त्यामुळे तूर खरेदीतही अडचणी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी सरकारने तातडीने गोदामांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली जात आहे.
राज्यात चालू हंगामात तुरीची जवळपास १२ लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली. यंदा गेल्यावर्षीपेक्षा तुरीखालील क्षेत्र वाढले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा जवळपास २ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज आहे. त्यापैकी २५ टक्के म्हणजेच २ लाख ९७ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट राज्यात देण्यात आले आहे. जिल्हानिहाय उत्पादकता जाहीर करून जिल्ह्यानिहाय खेरदीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.
जिल्हानिहाय तूर खरेदीचे उद्दीष्ट
जिल्हा…उत्पादकता…खरेदीचे उद्दीष्ट
अकोला…१४०० किलो …२१,६१६ टन
बुलडाणा…८०० किलो…१७,७६० टन
लातूर…७०० किलो…१२,९१८ टन
यवतमाळ… १२१८किलो…३२,३८४
अमरावती…१३६० किलो…३९,६५४ टन
वाशीम…७०३ किलो…११,६७६ टन
सोलापूर…७६० किलो…१८,८२६ टन
सांगली…७४३ किलो…२,०३८ टन
छत्रपती संभाजीनगर…८२९ किलो…७,४९१ टन
जालना…९५० किलो….११,७२५ टन
बीड…८३० किलो…९,८९३ टन
धाराशीव…६८० किलो…७३ टन
नांदेड…९०० किलो…१३,७२६ टन
परभणी…१०५० किलो…१०,२२५ टन
हिंगोली…११५० किलो…८,८६५ टन
वर्धा…१२०० किलो…१७,८३५ टन
नागपूर…१०५० किलो…१४,५९८ टन
भंडारा…६०० किलो… १,२८५ टन
गोंदिया…५५१ किलो…६४६ टन
चंद्रपूर…१४५० किलो….११,०२३ टन
गडचिरोली…११५१ किलो…१,७३२ टन
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.