Market Update Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast: लिंबुच्या दरात चांगली वाढ; बाजरी, कलिंगड, आले, कापूस तसेच काय आहेत आजचे सोयाबीन भाव

Daily Commodity Rates: सध्या बाजारात विविध कृषी उत्पादनांचे दर स्थिर किंवा सुधारलेल्या स्थितीत आहेत. बाजरीला स्थिर मागणी असून, लिंबू, कलिंगड, आणि कापसाच्या दरात वाढ दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या प्रभावामुळे बाजारातील आवक काहीशी घटली असून त्यामुळे दर वाढत आहेत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

बाजरीचे दर टिकून

बाजारीचे उत्पादन वाढल्याने यंदा पुरवठा चांगला असल्याचे व्यापारी सांगत आहेत. उन्हाळी बाजारीचा पेराही यंदा सरासरीच्या दरम्यान झाला आहे. बाजारातील बाजाराची आवक काहीशी कमी झाली आहे. तर बाजरीला सध्या देशात बाजारीला मागणी टिकून आहे. त्यामुळे सध्या बाजारीला सरासरी २ हजार ६०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान वाण आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहेत. पुढील काळात बाजारातील आवक काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरात काहीसे चढ उतारही दिसतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

लिंबू दर तेजीतच

वाढत्या उन्हाबरोबर लिंबुच्या दरालाही तडका मिळत आहे. लिंबुला मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातुलनेत मात्र लिंबाची बाजारातील आवक कमी आहे. यामुळे दरात मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा चांगली सुधारणा पाहायला मिळाली. लिंबू सध्या बाजारात ७ हजार ते ९ हजार रुपये क्विंटलच्या भावाने विकले जात आहे. बाजारातील लिंबू आवक पुढील काळात वाढत्या उन्हामुळे पुन्हा कमी होत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लिंबुचे दर तेजीतच राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

कलिंगडाच्या दरात सुधारणा

उन्हाचा चटका वाढत असल्याने कलिंगडालाही मागणी वाढली आहे. दुसरीकडे बाजारातील आवक काहीशी कमी झाली आहे. अनेक भागात कलिंगड प्लाॅट्सची काढणी पूर्ण झाली. यामुळे आवकेवर परिणाम झाला. कलिंगडाचे भाव क्विंटलमागे १०० रुपयांनी दोन आठवड्यात सुधारलेले आहेत. सध्या कलिंगडाला प्रतिक्विंटल सरासरी ९०० ते १००० रुपये भाव मिळत आहे. कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होत जाईल. त्यामुळे दरातही वाढ होईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

tसोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा

प्रक्रिया प्लांट्सनी आजही सोयाबीन खरेदीच्या भावात सरासरी ५० रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ५०० ते ४ हजार ७५० रुपयांच्या दरम्यान पोचले होते. तर बाजार समित्यांमध्येही खरेदी दरातही क्विंटलमागे ५० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. आज सोयाबीन ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयाने विकले गेले. सोयाबीनची बाजारातील आवक कमी होत आहे. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

कापूस दरात वाढ

मार्च महिना संपल्यानंतर बाजारातील कापसाची आवक खूपच कमी झालेली दिसत आहे. कापसाची कालची आवक ५२ हजार गाठी होती. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. तर दुसरीकडे कापसाला उठाव चांगला आहे. त्यामुळे दरात सुधारणा दिसत आहे. आजही कापसाच्या भावातील सुधारणा कायम होती. कापसाचा भाव सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कापसाची आवक पुढील आठवड्यापासून आणखी कमी होत जाईल. त्यामुळे कापसाच्या दरालाही आधार मिळेल, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT