Bajari  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bajari Rate : बाजरीला चांगली मागणी

Bajari Market : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही महिन्यांपासून बाजरीला चांगली मागणी आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही महिन्यांपासून बाजरीला चांगली मागणी आहे. बाजरीला ज्वारीच्या तुलनेत दर मिळत असल्याचे दिसतेय. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीची आवक कमी होत आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीची आवक कमी होत आहे. बाजारीचीही आधारभूत किमतीने (एफएक्यू) दराने खरेदी होत नाही. पण ठोक विक्रीत मिळणारा दर चांगला असून २२०० ते ३५०० व सरासरी २८५० रुपयांचा दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. किरकोळ दरात बाजरीही ४० रुपये किलो दराने विकली जातेय.

ज्वारीच्या दरात फारशी वाढ नाही. सध्या नगरसह जिल्हाभरातील बाजार समितीत ज्वारीला प्रतिक्विंटलला साधारणपणे साडेतीन हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी ज्वारीला चार हजारापर्यंत दर मिळत होता.

नगरसह सोलापूर जिल्ह्या‍त सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. बीड, धाराशीव, लातूर, पुणे, जळगाव तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत ज्वारी उत्पादन होते. अलीकडच्या काही वर्षांपासून मात्र गावरान ज्वारीच्या क्षेत्रात कमालीची घट होत आहे. असे असताना गावरान ज्वारीची मागणी मात्र वाढत आहे.

त्यामुळे ग्राहकाला किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलोनुसार ज्वारी घ्यावी लागत असताना नगरसह जिल्ह्यातील बाजार समित्यांत मात्र ठोक विक्रीत गावरान ज्वारीला फारसा दर मिळत नसल्याचे चित्र आहे.

नगर येथील बाजार समितीत सध्या दर दिवसाला १५० ते १७५ क्विंटलपर्यंत गावरान ज्वारीची आवक होत असून २२०० ते ३३०० व सरासरी २८५० रुपयाचा दर मिळत असल्याचे सांगण्यात आले.

गावरान ज्वारीला मागणी

विक्रीला येत असलेल्या ज्वारीला दर्जा नसल्याने आधारभूत किमतीने (एफएक्यू) दराने ज्वारीची खरेदी होत नसल्याचे सांगितले जात आहे. महिनाभरापूर्वी नगर येथील बाजार समितीत ज्वारीला २१०० ते ४ हजार रुपये व सरासरी ३०५० रुपयांचा दर मिळाला होता. अलीकडे गावरान ज्वारीला बाजारात मागणी असताना फारसा दर मिळत नसल्याने ज्वारी उत्पादक नाराजी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांदा दरासाठी आमदार अंबादास दानवेंचं समृद्धी महामार्गावर आंदोलन; पोलिसांनी दानवेंना घेतलं ताब्यात

India Economic Crisis: आर्थिक आपत्तीचे इशारे आणि शांत मध्यमवर्ग

Turmeric Farming: फिका रंग हळदीचा

Disaster Management: संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः सज्ज राहावे : मित्तल

Shaktipeeth Highway Protest: प्रस्तावित ‘शक्तिपीठ’साठी इंचभरही जमीन देऊ नका: राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT