Gold Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : सोने दर प्रति तोळा ५६ हजार रुपयांपर्यंत

गेल्या दोन महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात प्रचंड चढ-उतार सुरू आहे. महिनाभरापासून तर हे दर सातत्याने वाढत आहेत.

टीम ॲग्रोवन

जळगाव : जळगावच्या प्रसिद्ध सुवर्णबाजारात (Gold Market) गुरुवारी (ता. २२) सोन्याच्या दराने (Gold Rate) प्रतितोळा ५६ हजारांचा आकडा पार केला. अर्थात, हा दर जीएसटीसह असला तरी प्रत्यक्ष सोन्याचा भाव गुरुवारी ५५ हजारांवर गेला होता. चांदीही ‘भाव’ खात असून बाजारात चांदीचा दर गुरुवारी ७० हजारांच्या जवळपास पोहोचला.

गेल्या दोन महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात प्रचंड चढ-उतार सुरू आहे. महिनाभरापासून तर हे दर सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आर्थिक उलाढाली त्याला कारणीभूत असल्या तरी भारतात साधारणतः: लग्नसराईच्या हंगामात सोने- चांदीच्या दरात वाढ होते, असे मानले जाते.

दर ६० हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज

गुरुवारी सोन्याच्या भावाने जळगावात उच्चांक गाठला. २४ कॅरेट प्रति तोळा (१० ग्रॅमसाठी) सोन्याचा भाव जळगावात ५४ हजार ८०० रुपये होता, त्यात ३ टक्के जीएसटीची रक्कम समाविष्ट केली तर तो दर ५६ हजारांपर्यंत पोहोचतो. येणाऱ्या काळात सोन्याचा दर ६० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

चांदीही ७० हजारांच्या घरात

प्रति किलो चांदीचा दर जळगावच्या बाजारात ६८ हजार ५०० होता. त्यात ३ टक्के जीएसटीची रक्कम समाविष्ट केली तर चांदी ७० हजारांपर्यंत विकली गेली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत असून, त्याचा परिणाम जळगावच्या बाजारातही जाणवत आहे. येणाऱ्या काळात कोरोनाचा उद्रेक वाढल्यास सोन्याचे दर अधिक वाढण्याची शक्यता आहे.

- मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, रतनलाल बाफना ज्वेलर्स, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

Maharashtra Weather Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामानाची निर्मिती

Sugarcane Crushing Season: यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, सरकारचा निर्णय, पण साखर उतारा घटणार?

Crop Damage : घेवडा करपल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Water Management Meeting: जल व्यवस्थापन बैठकीस शासनाच्या अधिकाऱ्यांची दांडी

SCROLL FOR NEXT