Gold Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : पंधरवड्यात सोनेदरात ३६०० रुपयांनी वाढ

Gold Market Update : सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत सोनेदरात ३६०० रुपयांनी वाढ झाली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत सोनेदरात ३६०० रुपयांनी वाढ झाली. तर चांदीत २३०० रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव खूप जास्त आहेत. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल या अपेक्षेने सोन्याचा दर वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. सोमवारी (ता. ११) जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचे १० ग्रॅमचे दर ६८ हजारांच्या जवळ पोहोचले. पंधरा दिवसांपूर्वी ६४ हजार ५०० रुपये असलेले सोने दरात पंधरा दिवसात ३,६०० रुपयांनी वाढ झाली.

चांदीचे भावही वाढले असून प्रतिकिलो ७३ हजार २०० रुपयांवर गेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी चांदीचा दर ७० हजार ९०० रुपये होता. पंधरा दिवसांत दोन्ही धातूंनी मोठा पल्ला गाठला आहे.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान इस्राईल आणि हमास यांच्यातील लष्करी संघर्षामुळे जगभरात अनिश्चितता वाढली आहे. जगभरातील केंद्रीय बँका सोने खरेदी करत आहेत. विशेषतः सेंट्रल बँक ऑफ चायना सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहे.

चिनी नागरिक महागाई आणि देशातील अशांत शेअर बाजार आणि मालमत्ता क्षेत्राविरुद्ध बचाव म्हणून सोन्याचा साठा करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. अशीच स्थिती राहिली तर लवकरच सोने उच्चांकी पातळी गाठण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सोने-चांदीच्या दरात गेल्या पंधरा दिवसांत मोठी वाढ झाली. सोनेदर ३६०० रुपयांनी वाढला. चांदीदरही २३०० रुपयांनी वाढला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणात अपेक्षित बदल झाल्यामुळे सोन्याच्या दरात ही वाढ झाली आहे. तसेच पुढे लग्नसराईमुळे देशांतर्गत सोन्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे सोनेदर वाढून लवकरच ७० हजारांचा टप्पा पार करेल.
- राजेश रोकडे, उपाध्यक्ष, ऑल इंडिया जेम्स ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काउंसिल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT