Ginger Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Rate : आले दरात पंधरा दिवसांत चार ते पाच हजारांची घट

Ginger Market : मागील महिन्यापासून सुरू झालेली घट अजूनही सुरूच आहे. सध्या जुन्या आले पिकास प्रतिगाडी (५०० किलो) २५ ते २६ हजार रुपये दर मिळत आहे.

विकास जाधव 

Satara News : आले उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत. मागील महिन्यापासून सुरू झालेली घट अजूनही सुरूच आहे. सध्या जुन्या आले पिकास प्रतिगाडी (५०० किलो) २५ ते २६ हजार रुपये दर मिळत आहे. मागील पंधरा दिवसांत आल्याच्या दरात प्रतिगाडी चार ते पाच हजार रुपये घट झाली आहे.

आले पिकांच्या दरातील घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचत असल्याने मूळकुज, कंदकुजमुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आले. एकूण लागवडीच्या ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर पिकांवरील मूळकुज झाली आहे. आले पीक टिकविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात असल्याने खर्चात वाढ होत आहे. सध्या प्रतवारी केलेल्या आल्‍यास प्रतिगाडी २५ ते २६ हजार रुपये तसेच नवीन आल्यास प्रतिगाडी आठ ते नऊ हजार रुपये दर मिळत आहे.

मागील १५ दिवसांच्या तुलनेत प्रतवारी आल्याच्या दरात चार ते पाच हजार रुपये घट झाली आहे. नवीन आल्याच्या दरात दोन ते तीन हजार रुपयांनी घट झाली आहे. आले जास्त काळ जमिनीत ठेवू शकणार नसल्यानेही व्यापाऱ्यांकडून आले दर पाडले जात असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. मात्र, परिस्थिती हातात नसल्याने कमी दरातही आले देण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

हे कमी काय म्हणून मूळकुज, कंदकुजीचा धोका वाढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. नवीन आले लागवडीची परिस्थिती फारशी वेगळी नाही. नव्या लागवडीसही मूळकुज, कंदकुजीचा प्रादुर्भाव वाढला आहे. काही शेतकऱ्यांना नियंत्रित येत नसल्याने आले काढण्याशिवाय पर्याय नाही. नव्या आल्याची अजून काढणी सुरू झालेली नाही. ही काढणी सुरू झाल्यास अजून आल्याच्या दर घसरण्याचा अंदाज व्‍यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

खोडवा काढावा लागणार

खोडवा आले काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. गणपती उत्सवात चांगले दर मिळण्याची आशा असते. मात्र हा अंदाज शेतकऱ्यांचा चुकलेला आहे. आले दरात सुधारणा होण्याऐवजी यंदा घट झाली आहे. आले काढणीचा कालावधी संपत आल्याच्या दर्जा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे जास्त काळ जुने आले ठेवणे शक्य होणार नाही. साधारणपणे जुने आले दसरा सणापर्यंत ठेवले जाते. यानंतर जुने आले खरेदी व्यापाऱ्यांकडून खरेदी टाळली जाते. यामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहे. कमी दर असतानाही आले काढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यामुळे आर्थिक नुकसान होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT