Ginger Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Rate : अडवणूक, नफेखोरीने ग्रस्त ‘आले बाजार’

अगोदरच हैराण असलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारीही फसवू लागले आहेत. नव्या-जुन्याचा वाद निर्माण करून अडवणुकीतून फसवणूक आणि नफेखोरी केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

विकास जाधव 

सातारा : अगोदरच हैराण असलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना (Ginger Farmer) व्यापारीही फसवू लागले आहेत. नव्या-जुन्याचा वाद निर्माण करून अडवणुकीतून फसवणूक आणि नफेखोरी केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. यापूर्वीप्रमाणे सरसकट आले खरेदी (Ginger Procurement) करण्याचा आग्रह धरला जात आहे, मात्र यामध्येही शेतकऱ्यांचा हाताला फारसे काही लागलेले नाही.

सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी न परवडणाऱ्या दरामुळे आले न काढता, तसेच जमिनीत ठेवले होते. चार वर्षांनंतर यंदाच्या जून महिन्यापासून दरात अल्प वाढ होण्यास सुरवात झाली. जुलैतही अल्प सुधारणा झाली आहे. एका गाडी (५०० किलो) मागे सहा ते सात हजार रुपयांनी सुधारणा झाली.

प्रतिगाडीस १२ ते १६ हजार रुपये दर मिळू लागला होता. मात्र आले खरेदीदार व्यापाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे दरवाढ होऊनही आले उत्पादक शेतकऱ्यांची परवड सुरू राहिली. यापूर्वी आल्याच्या खोडवा पिकाची काढणी करताना जुने आणि नवीन आले अशी विभागणी होत नव्हती. मात्र आता व्यापाऱ्यांमधल्या संघर्षाचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे, यातून लूट वाढली आहे.

जुने आणि नवीन मालाची खरेदी करताना एकतर नवीन माल तसाच शेतात टाकून दिला जातो अथवा त्याला कवडीमोल दर दिला जातो. सध्या ७० टक्के जुना माल आणि ३० टक्के नवा माल अशी परिस्थिती आहे. सध्या जुन्या मालास प्रतिगाडीस १२ ते १६ हजार, तर नव्या मालास ८ ते १० हजार रुपये तर बासा (खराब) तीन हजार रुपये प्रतिगाडीस दर दिला जात आहे. मात्र ऑक्टोबरमध्ये नव्या मालास ४००० रुपये दर होता, नव्या मालास जवळपास खराब आल्याच्या दरात खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली जात होती.

पुढे मात्र हे दोन्ही माल एकत्र करून चांगल्या दराने विक्री करून शेतकऱ्यांच्या दुप्पट, तिप्पट पैसे कमविण्याचे धंदे केले जात आहेत. व्यापाऱ्यांच्या या धोरणामुळे दरात सुधारणा होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असून, लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या अन्यायाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच सातारा, कऱ्हाड, कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघटित येऊन व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र यासाठी व्यापाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या बैठकांना बहुतांशी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच आहे. हे कमी काय म्हणून पुन्हा दराची घसरण झाली असून, सध्या प्रतिगाडी १० ते ११ हजार रुपये दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. (समाप्त)

नवा-जुना माल स्वतंत्र विभागणी न करता, एकत्र खरेदी व एकाच दराने खरेदी करावा यासाठी शेतकरी संघटित होऊन काम करत आहेत. काही व्यापाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद दिला, मात्र अजूनही सर्व व्यापारी तयार झालेले नाहीत. शेतकऱ्यांना आपला मात्र बाजार समितीकडे नोंद असलेल्या व्यापाऱ्यास घालणे हिताचे आहे.
मनोहर साळुंखे, कृषिभूषण, नागठाणे, जि. सातारा
व्यापाऱ्यांनी विभागणी न करता एकत्रित आल्याचा दर शेतकऱ्यांना द्यावा. यापूर्वीही असाच व्यवहार होत असे. नवीन लोक या व्यापारात आल्याने संपूर्ण आले पिकाची आणि दराची वाट लावली आहे. आले पीक वाचवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सरसकट दर मिळण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली लढा सुरू आहे. संघटनेकडून गस्त पथके तयार केली आहेत. या पथकाकडून जागोजागी जाऊन व्यापाऱ्यांना धडा शिकवला जात आहे.
अनिल पवार, राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Alert: मराठवाड्यात पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील ४ दिवस पावसाची शक्यता

Khandesh Rainfall : पावसाची पाठच; ‘हतनूर’मधून विसर्ग घटला

Nashik DCC Bank : जिल्हा बँकेची सामोपचार कर्ज परतफेड योजना लागू

Floriculture Management: सणासुदीसाठी झेंडू, शेवंती, निशिगंध फुलांचे नियोजन कसे करावे? उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचा सल्ला

PM Kisan Yojana : दुहेरी नोंदणीमुळे पीएम किसानचा लाभ मिळेना

SCROLL FOR NEXT