Fertilzer Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fertilizer : खत लिंकिंगविरोधात खत विक्रेतेच आक्रमक

नगर जिल्ह्यात आवश्यक खतासोबत अनावश्यक खताची लिंकिंग होतच नाही, या कृषी विभागाच्या दाव्याचा शेवगाव तालुक्यातील खत विक्रेत्यांनीच भांडाफोड केला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर ः नगर जिल्ह्यात आवश्यक खतासोबत अनावश्यक खताची लिंकिंग (Fertilizer Linking) होतच नाही, या कृषी विभागाच्या (Agriculture Department) दाव्याचा शेवगाव तालुक्यातील खत विक्रेत्यांनीच (fertilizer Seller) भांडाफोड केला आहे. ‘‘आवश्यक खतासोहब अनावश्यक खताची लिंकिंग करून ते बळजबरीने माथी मारले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यातून होणाऱ्या जाचातून सुटका करावी,’’ अशी मागणी खत विक्रेत्यांनी केली आहे. खत लिंकिंग धोरणाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (ता. २५) एक दिवस दुकाने बंद ठेवून निषेधही करण्याचा निर्णय झाला आहे. खत लिंकिंग विरोधातील थेट विक्रेत्यांचे हे पहिलेच बंड आहे.

नगर जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या युरिया १८:४६:००, १०:२६:२६ आणि १५:१५:१५ यांसारख्या खतांसोबत अनावश्‍यक खताची, औषधांचीही लिंकिग केली जात आहे. अनावश्यक खत घ्यायला नकार दिल्यास आवश्‍यक खते देण्यास कंपन्या नकार देतात. आवश्यक व अनावश्यक खताची वाहतूक खर्चही विक्रेत्यांकडून घेतला जातो. त्यामुळे निर्धारित किमतीपेक्षा अधिक रकमेत खत दुकानात येते. त्यामुळे निर्धारित किमतीत खत विक्री करणे अवघड होऊन बसते. याबाबत शेवगावसह नगर जिल्ह्यातील खत विक्रेते एकतर त्रस्त आहेत.

कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारीच खत लिंकिंगला पाठबळ देत असल्याने स्थानिक कृषी अधिकाऱ्यांचाही नाइलाज होत आहे. या बाबत अनेक वेळा तक्रारी झाल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता ही लिंकिंग बंद व्हावी म्हणून शेवगाव तालुक्यातील विक्रेत्यांनी या बाबत बंड केले. शेतकऱ्यांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते. त्यामुळे या जाचातून सुटका करावी, अशा मागणीचे निवेदन कृषी अधिकाऱ्यामार्फत कृषी संचालकांना पाठविले आहे. खत लिंकिंग धोरणाचा निषेध करण्यासाठी उद्या (ता. २५) एक दिवस दुकाने बंद ठेवून निषेधही करण्याचा निर्णय झाला आहे.

भरारी पथके काय करतात?

नगर जिल्ह्यात खताची लिंकिंग करून युरिया व अन्य खतांसोबत अनावश्यक खतेही बळजबरीने दुकानदारांना विकली जात आहेत. त्याचा वाहतूक खर्चही खत कंपन्या वसूल करत आहेत. या बाबत सतत तक्रारी होत असताना खताची लिंकिंगच होत नाही, असा ठासून दावा कृषी विभाग करत होता. मात्र विक्रेत्यांनी हे उघडे पाडले. शेतकऱ्यांची खते बियाणे संदर्भात अडवणूक होऊ नये, या साठी भरारी पथके नियुक्त केल्याचा दावा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केला. मग भरारी पथके नेमकी काय करतात, असा प्रश्‍न आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT