Soybean Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : शेतकऱ्यांकडे खरचं सोयाबीनचा मोठा साठा?

बाजारातील सोयाबीनची आवक यंदा वाढली

Anil Jadhao 

पुणेः देशातील सोयाबीन (Soybean Rate) पुरवठा यंदा विक्रमी पातळीवर पोचला. पण चालू हंगामातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये बाजारातील सोयाबीन आवक, गाळप आणि सोयापेंड (Soyameal)निर्यातही वाढली. तसंच पशुखाद्यात सोयाबीनचा वापरही वाढल्याचं सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SOPA) अर्थात सोपाने स्पष्ट केले.

देशातील सोयाबीन हंगाम सुरु होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी झाला. आता देशातील बाजारात सोयाबीनची आवक आणि गाळप वाढले. यंदाच्या हंगामात ऑक्टोबर महिन्यापासून सोयाबीनची आवक वाढली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशातील बाजारात ५० लाख टन आवक झाली. तर मागील हंगामात याच काळातील सोयाबीन आवक ४० लाख टनांवर होती. म्हणजेच यंदा सोयाबीन आवक जवळपास २५ टक्क्यांनी वाढली, असे सोपाने स्पष्ट केले.


देशातील बाजारात सोयाबीनची आवक वाढल्यानंतर गाळपही वाढले. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या महत्वाच्या राज्यांमध्ये सोयाबीनची आवक जास्त आहे. आवकेच्या गतीमुळं सोयाबीन गाळपही ५१ टक्क्यांनी वाढले. यंदा पहिल्या तीन महिन्यांमध्ये ३२ लाख ५० हजार टन सोयाबीनचे गाळप झाले. मागील हंगामात याच तीन महिन्यांमध्ये केवळ २१ लाख ५० हजार टन सोयाबीनचे गाळप झाले होते, असेही सोपाने सांगितले.

सोयाबीनचे गाळप वाढल्याने सोयापेंड निर्मितीही वाढली. यंदा पहिल्या तीन महिन्यांमध्ये सोयाबीन निर्मिती ५२ टक्क्यांनी वाढली. यंदा २६ लाख १० हजार टन सोयापेंड निर्मिती झाली. गेल्या हंगामात याच काळात १७ लाख १६ हजार टन सोयापेंड हाती आली होती.

यंदा गेल्याहंगामातील सोयाबीनचा शिल्लक साठा जास्त होता. त्यामुळं सोयाबीन पुरवठा वाढला. परिणामी यंदा सोयाबीनचे गाळप वाढून सोयापेंड निर्मिती वाढण्याचा अंदाज होता. त्यामुळं सोयापेंड वापरापेक्षा पुरवठा जास्त होतो की काय? असा प्रश्न होता. पण पहिल्या तीन महिन्यांमध्ये सोयापेंडचा वापरही वाढला.

सोयापेंड वापर वाढला
सोयापेंडचा वापर यंदा १२ टक्क्यांनी वाढला. मागील हंगामात १६ लाख ५० हजार टन सोयापेंड वापर झाला होता. तो यंदा १८ लाख ५० हजार टनांवर पोचला. तर निर्यातही ४९ टक्क्यांनी वाढली. यंदा ४ लाख टन सोयापेंड निर्यात झाली.

किती सोयाबीन शिल्लक?
यंदा देशात १४७ लाख टन सोयाबीनचा पुरवठा झाला. त्यापैकी अद्यापही जवळपास ९९ लाख टन सोयाबीन शेतकरी आणि प्रक्रिया प्लांट्स तसेच व्यापाऱ्यांकडे पडून आहे, असंही सोपानं म्हटलं. तसंच पुढील हंगामासाठी शिल्लक साठाही यंदा जास्तच राहील, असाही अंदाज सोपानं व्यक्त केला.

सोयाबीन बाजाराला आधार ?
सोपाच्या अंदाजाप्रमाणं यंदा गेल्यावर्षीचा शिल्लक साठा विक्रमी पातळीवर होता. तर उत्पादनही वाढलं. पण त्याचा सध्यातरी दरावर परिणामी जाणवत नाही. दर ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यातच देशातून सोयापेंड निर्यातही वाढतेय. त्यामुळं पुढील काळात सोयाबीन दरावर दबाव येण्याची शक्यता कमीच दिसते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT