Soybean Farmer Problem: वर्धामध्ये पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, अनेक शेतकऱ्यांना एकरी अवघ्या दोन ते चार पोत्यांचाच उतारा मिळाला आहे. मात्र, सध्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने दराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे..यंदा सोयाबीनचे पीक चांगले येऊन आर्थिक परिस्थितीला आधार मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, ऐन फुलधारणेच्या काळात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने शेंगांमधील दाण्यांची अपेक्षित वाढ होऊ शकली नाही. परिणामी, उत्पादनात मोठी घट झाली आहे..Soybean Rate Update : सोयाबीन बाजारात मोठी उलथापालथ! आवक कमालीची मंदावली.अनेक शेतकऱ्यांच्या शेतात एकरी दोन ते चार पोत्यांचाच उतारा मिळत असल्याचे चित्र आहे. सोयाबीन लागवडीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीवर मोठा खर्च करण्यात आला. मात्र, अपेक्षित उत्पादन हाती न आल्याने हा खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांना सोयाबीनची काढणी करणेही परवडत नसल्याने त्यांनी पीक कापणीऐवजी रोटावेटर फिरवून जमिनीत गाडण्याचा निर्णय घेतला आहे. मेहनत आणि खर्च करूनही उत्पादनातून अपेक्षित परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे..Soybean Arrivals: सोयाबीनची आवक घटल्याने बाजार समित्यांचे उत्पन्न घटणार.कपाशी, तूर वाचविण्याची धडपडसोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्यानंतर शेतकऱ्यांसमोर आता कपाशी आणि तूर ही पिके वाचविण्याचे आव्हान आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने कपाशीला पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी स्प्रिंकलरच्या साहाय्याने सिंचन करीत आहेत. आधीच आर्थिक अडचणीत असताना सिंचनासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे..दराने काहीसा दिलासाएकीकडे उत्पादनात मोठी घट झाली असली, तरी दुसरीकडे बाजारात नव्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार ८७५ रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ७०८ रुपये असताना बाजारात त्यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने सध्या दराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. उत्पादन कमी असल्याने बाजारात आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातील ही अनुकूलता कायम राहिल्यास काही प्रमाणात आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत होऊ शकते. मात्र, एकरी दोन ते चार पोत्यांच्या उताऱ्यातून वाढलेल्या उत्पादन खर्चाची भरपाई कितपत होणार, हा प्रश्न कायम आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.