Cotton Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच

यंदा पुसद तालुक्यात सुमारे २८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. परतीचा पाऊस लांबल्याने पहिली वेचणी करण्यास विलंब झाला आहे.

टीम ॲग्रोवन

आरेगाव, जि. यवतमाळ : यंदा पुसद तालुक्यात सुमारे २८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड (Cotton Cultivation) करण्यात आली. परतीचा पाऊस लांबल्याने पहिली वेचणी (Cotton Picking) करण्यास विलंब झाला आहे. यातच तालुक्यात अद्यापही कुठेही कापसाची खरेदी (Cotton Procurement) सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा पहिला वेचणी केलेला कापूस घरातच आहे.

साधारणतः दसऱ्यापासून कापूस खरेदीला प्रारंभ होऊन शेतकरीवर्ग घरात आलेला कापूस विकून दिवाळी साजरा करतो. परंतु यावर्षी खरेदीस विलंब होत असल्याने कापूस घरातच पडून आहे. या संदर्भात कापूस खरेदीदार जिनिंग व प्रेसिंगच्या सूत्रांशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी यंदा खरेदीस विलंब होत असल्याचे सांगून धनत्रयोदशीला केवळ काटापुजन केल्याचे सांगितले.

कपाशीला यंदा चांगला दर मिळण्याची आशा असताना अपेक्षित उत्पन्न होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. प्रतिक्विंटल दहा हजार रुपयांवर भाव मिळण्याची अपेक्षा असताना केवळ ८ हजार ३०० रुपयापर्यंत आर्द्रता मोजून कापसाला दर मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

कापूस वाचविण्याची जिवापाड धडपड

सद्यःस्थितीत वेचणी केलेल्या कापसात ३० टक्के आर्द्रता आहे. त्यामुळे हा कापूस प्रक्रिया करण्यास अवघड जातो. यामुळेच किमान दहा टक्के आर्द्रता असलेला कापूस विक्रीस येण्यास सुरुवात झाल्यावर खरेदीला वेग येईल. यंदा सततच्या पावसाने कपाशी पिकाचे मोठे नुकसान केले. पाऊस उघडल्यानंतर सावरलेला कापूस वाचविण्यासाठी शेतकरी जिवापाड प्रयत्न करीत आहेत.

दरवर्षी दसऱ्यापासूनच कापूस खरेदीस प्रारंभ होतो. यंदा मात्र दसऱ्यानंतरही पाऊस पडत राहिला. त्यामुळे वेचणी केलेला कापूस ओला झाला. आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. बुरशी येऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काळात चांगल्या प्रतीचा कापूस खरेदीस वेग येईल.
आशीष चक्करवार, वरूड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT