Green Chilly Container Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chilly Export : पंधरा टन हिरव्या मिरचीची दुबईला निर्यात

Chilly Market : स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची हिरवी मिरची थेट दुबईला निर्यात करण्यात यश आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Wardha News : स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची हिरवी मिरची थेट दुबईला निर्यात करण्यात यश आले आहे. या माध्यमातून या भागातील शेतकरी कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा पल्ला गाठला असून पहिल्या प्रयत्नाद्वारे सुमारे १५ टन हिरव्या मिरचीची निर्यात करण्यात आली.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पामधून (स्मार्ट) शेतकरी उत्पादक कंपन्या शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी करीत आहेत. त्या माध्यमातून त्या-त्या भागात शेतीमालाच्या मूल्यवर्धनाचा उद्देश साधला जात आहे. त्यापुढील टप्प्यात कंपन्यांनी पॅकिंग आणि ब्रॅण्डिंगवर देखील भर दिला आहे.

एवढ्यावरच न थांबता नागपुरातील काही कंपन्यांनी आता निर्यात क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यामध्ये अंतरंग आणि इंड ॲग्रो या दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. प्रवीण वानखेडे संचालित युनिव्हर्स एक्‍सपोर्टच्या सहकार्याने ही मिरची दुबईला पाठविण्यात आली.

निर्यातीपूर्वीची शीतकरण प्रक्रिया पणन मंडळाद्वारे स्थापित तसेच महाऑरेंजच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या कारंजा घाडगे येथील संत्रा निर्यात सुविधा केंद्रात करण्यात आली.

निर्यात कंटेनरला हिरवा झेंडा दाखविताना महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, पणन विभागाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी पल्लवी तलमले, स्वाती गावंडे, बाळाराम बलगमवार, सत्यपाल ठाकरे, पंकज गिरडे उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळाराम बलगमवार यांनी केले. पंकज गिरडे यांनी आभार मानले.

शेतीमालाचे मूल्यवर्धन त्यासोबत निर्यातीवर भर दिल्यास या भागातील शेतीमालाला चांगला दर मिळणे शक्‍य आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांना निर्यातीकरिता प्रोत्साहित केले जात आहे.
डॉ. अर्चना कडू, प्रकल्प संचालक, आत्मा, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT