Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Price Difference : शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव फरकाची रक्कम द्या

Soybean MSP Procurement : सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

Team Agrowon

Latur News : सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव व हमीभाव यातील फरक रक्कम सरकारने द्यावी आणि हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी केंद्राने दिलेली चोवीस दिवसांची मुदतवाढ कायम ठेवावी, आदी मागण्या लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी २४ दिवसांची मुदतवाढ जाहीर केली होती. पण केंद्राने कोणतीही मुदतवाढ दिली नसल्याचे राज्याच्या पणन विभागामार्फत सांगितले जात आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे, याकडेही देशमुख यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. 'नाफेड'च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केला जात आहे. यासाठी नोंदणी करुनही अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करण्यात आलेली नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २४ दिवसांची मुदतवाढ कायम रहावी म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलतेने लक्ष घालावे.

राज्यातील नोंदणी केलेल्या ७ लाख ६४ हजार ६५४ शेतकऱ्यांपैकी २ लाख ५३ हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी अद्याप झालेली नाही. याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, सोयाबीन खरेदीला व नोंदणीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune MTI Journey: ‘एमटीआय’ची आठ दशकी दमदार वाटचाल

Orange Farming: करंजी परिसरातील शेतकऱ्यांना संत्र्यातून दिलासा

Farmer Issue: पुरंदरमधील वाटाणा उत्पादक अडचणीत

CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस

Misbranded Pesticide Case: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!

SCROLL FOR NEXT