Eggs  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Egg Price : ओमानची निर्यात प्रभावित झाल्याने अंडीदर दबावात

Egg Market : थंडीमुळे तेजीत आलेल्या अंडीदरात आता काहीशी घसरण नोंदविण्यात आली आहे. दत्त जयंती त्यासोबतच इतरही धार्मिक उत्सव त्यासोबतच तमिळनाडूतील नमक्‍कल राज्यातून ओमानला होणारी अंडी निर्यात प्रभावित झाल्याने दर दबावात आल्याचे सांगितले जाते.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : थंडीमुळे तेजीत आलेल्या अंडीदरात आता काहीशी घसरण नोंदविण्यात आली आहे. दत्त जयंती त्यासोबतच इतरही धार्मिक उत्सव त्यासोबतच तमिळनाडूतील नमक्‍कल राज्यातून ओमानला होणारी अंडी निर्यात प्रभावित झाल्याने दर दबावात आल्याचे सांगितले जाते. प्रति शेकडा ६७५ रुपयांवरून हे दर थेट ५७० रुपयांवर आले आहेत.

महाराष्ट्राची रोजची अंडी मागणी सुमारे एक कोटींच्या घरात आहे. परंतु थंडीच्या परिणामी मागणीत झालेल्या वाढीच्या परिणामी अंड्याचे दरात चांगलीच तेजी अनुभवली जात होती. सुमारे ६७५ रुपये प्रति शेकडा (१०० नग) याप्रमाणे अंडी दर पोहोचले होते. हा गेल्या काही वर्षांतील सर्वांत उच्चांकी दर होता, असे सांगितले जाते. मध्यंतरीच्या काळात अंडी तसेच ब्रॉयलर चिकनच्या दरात घट झाल्याने अनेक व्यावसायिकांनी या व्यवसायातून माघार घेतली होती.

त्यामुळेच बाजारात मागणी वाढती असताना पुरवठा कमी होता. त्यामुळे देखील दर तेजीत आल्याचे सांगितले जाते. आता धार्मिक उत्सवांमुळे मागणी कमी झाली. त्याच्या परिणामी अंडी दर आता ५७० रुपये प्रति शेकडा असे खाली आले आहेत. यापुढील काळात या दरात आणखी घट होईल, अशी भीती वर्तविली जत आहे. मात्र थंडीत वाढ झाल्यास मागणी पुन्हा वाढून दरात सुधारणांची देखील शक्‍यता आहे.

ओमानकडून आयात ठप्प

तमिळनाडू राज्यातील नमक्‍कल तसेच इतर भागातील रोजचे अंडी उत्पादन सुमारे सहा कोटींपेक्षा अधिक आहे. या राज्यातून ओमानला अंडी निर्यात होते. काही कारणांमुळे ही अंडी निर्यात प्रभावित झाली. त्याचाही परिणामी देशभरातील अंडी दरावर झाला आहे. तमिळनाडू राज्यात शालेय पोषण आहारात देखील अंडी दिली जातात. परंतु त्या भागात वादळ येणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. त्यामुळे तेथील शाळा बंद आहेत. या दोन्ही कारणांमुळे अंडी शिल्लक राहतात. त्याचा फटका बसत अंडी दर खाली आले आहेत.

तमिळनाडू राज्यातून ओमानला होणारी अंडी निर्यात प्रभावित झाली आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातही धार्मिक उत्सव असल्याने दरात घसरण झाली आहे. ६७५ रुपयांवरून हे दर थेट ५७० रुपयांवर आले आहेत. थंडीत वाढ झाल्यास मागणी वाढून पुन्हा दरात काही अंशी सुधारणा होईल, अशी शक्‍यता आहे.
रवींद्र मेटकर, लेअर पोल्ट्रीधारक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT