Team Agrowon
थंडीत वाढ होताच देशभरात अंड्यांच्या मागणीतही वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अंड्यांच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे.
मका आणि सोया पेंडच्या दरात घसरण झाल्याने प्रति नग अंड्याचा उत्पादकता खर्चही कमी झाल्याने लेअर पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सण, उत्सवाच्या कालावधीत अंडी मागणीत घट होते असा अनुभव आहे. परंतु यंदा मात्र तशी परिस्थिती उद्भवली नाही. या वेळी प्रति शेकडा (१०० नग) अंड्यांचे दर ५०० रुपयांच्या पुढेच होते.
आता थंडीला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा दरात सुधारणा अनुभवली जात आहे. विदर्भात अमरावती हे अंडी उत्पादनाचे हब मानले जाते.
अंड्यांना सध्या प्रति शेकडा ५७० रुपयांचा दर मिळत आहे. महाराष्ट्राची रोजची अंडी मागणी ही एक कोटीच्या घरात असल्याचे नॅशनल एग्ज को-ऑर्डीनेशन कमिटी (एनइसीसी) सांगते.
त्यानुसार सद्यःस्थितीत महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा अधिक अंड्यांना मागणी आहे. त्यामुळेच दर वधारले आहेत.
दिल्ली बाजारातही दर तेजीत असून, या ठिकाणी प्रति शेकडा ६०० रुपये, अहमदाबादमध्ये ५९०, हैदराबाद ५३५, तर मुंबई परिसरात अंडी दर प्रति शेकडा ६०५ रुपयांवर पोहोचले आहेत.
Saffron Farming : महागड्या केशरची शेती कशी केली जाते?