tur rate
tur rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement : आयात तूर खरेदीतही केंद्र सरकारपुढे अडचणी

अनिल जाधव

पुणेः देशातील तूर टंचाई (Tur Shortage) दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं आयात तूर खरेदीचा (Import Tur Procurement) निर्णय घेतला. मात्र १२ टक्के ओलाव्याची अट असल्यानं आयातदार तूर देण्यास इच्छूक दिसत नाहीत. ओलावा किमान १६ टक्क्यांवर ठेवावा, अशी मागणी आयातदार करत आहेत. ही अट मान्य केली तरीही खुल्या बाजारात दर (Tur Rate) तेजीत असल्याने केंद्राला किती तूर खरेदी करता येईल, याबाबत मत मतांतरं आहेत.

देशात सध्या तुरीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळं तुरीचे दरही तेजीत आहेत. त्यातच यंदा तुरीची जवळपास साडेचार टक्क्याने लागवड कमी झाली. अनेक भागात तूर लागवडही वेळेवर होऊ शकली नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाचा फटका पिकाला बसला होता.

तसचं मागील आठवडाभरापासून देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे तूर पिकाला मोठा फटका बसला. परिणामी नव्या हंगामातही तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. बाजारात तुरीचा पुरवठा कमी होऊन दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

त्यातच सध्या सणांमुळं तुरीला मागणी वाढलेली आहे. त्यामुळं तुरीचे दर तेजीत आहेत. पुढील काळातील तुरीची टंचाई दूर करण्यासाठी केंद्र सरकार बफर स्टाॅक करण्यावर भर देत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आयात तूर खेरदीची प्रक्रिया सुरु केली. सध्या आफ्रिकी देशांतील तूर बाजारात येतेय.

या देशांमधून आयात होणारी जास्तीत जास्त तूर खरेदी करण्याचं उद्दीष्ट केंद्र सरकारनं ठेवलंय. केंद्र सरकार ९० हजार टनांपर्यंत आयात तूर खरेदी करु शकतं, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

आयात तूर राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघामार्फत खरेदी केली जाणार आहे. संघाने आफ्रिकेतील देशांमधून आयात होणाऱ्या तुरीची खरेदी करण्यासाठी १२ टक्के ओलाव्याची अट ठेवली आहे. तर बर्माच्या तुरीचा ओलावा १४ टक्के निश्चित केला आहे. मात्र ओलाव्याच्या या अटीवर कोणताही आयातदार संघाला तूर देण्यास इच्छूक नाही.

कारण या अटीमध्ये तूर देणं कठीण असल्याचं सांगत ओलाव्याची अट १६ टक्के करण्याची मागणी आयातदारांनी केली आहे. राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघाने अटींमध्ये बदल केला तरी किती खरेदी होईल, याबाबत अद्याप सांगता येणार नाही. कारण खुल्या बाजारातही तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या बाजारात तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज जाणकार आणि प्रक्रिया उद्योगांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT