Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीनला २० टक्‍के बोनस आणि १०० टक्‍के खरेदी व्हावी

Soybean MSP : खाद्यतेलात आयात शुल्कात केलेली वाढ त्यानंतर २५ टक्‍के सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Team Agrowon

Nagpur News : खाद्यतेलात आयात शुल्कात केलेली वाढ त्यानंतर २५ टक्‍के सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु हे सारे करुनही सोयाबीन दरात तेजीची शक्‍यता कमीच असल्याचा दावा शेतीमाल विपणन क्षेत्राचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला आहे. सोयाबीन दरात तेजीसाठी सोया पेंड (डिओसी) दरात तेजीचे प्रयत्न व्हावे किंवा सोयाबीनला २० टक्‍के बोनस देत १०० टक्‍के सोयाबीनची शासकीय खरेदी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली आहे.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांना या संदर्भाने त्यांनी पत्र लिहिले असून त्यात हा दावा करण्यात आला आहे. पत्रानुसार, सोयाबीन दरात तेजी येईल, या शक्‍यतेने केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात २० टक्‍के वाढ केली. त्याचा सोयाबीन बाजारावर कोणताच परिणाम झाला नाही.

आजही बाजारात सोयाबीन ३८०० ते ४००० रुपयांवरच स्थिर आहे. याउलट खाद्यतेलाचा बाजार मात्र तेजीत आला आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सोयाबीन दरात तेजीच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलन केले. कृषिमंत्री म्हणून तुमची वाट रोखत या मुद्याकडे लक्ष्य वेधले. त्याची दखल घेत सरकार २५ टक्‍के सोयाबीनची हमीभावाने खरेदी करेल, असे आश्‍वासन देण्यात आले.

परंतु जागतिक बाजाराचा कल लक्षात घेता सरकार पातळीवर २५ काय तर ५० टक्‍के सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यात आले तरी उर्वरित ५० टक्‍के सोयाबीनला ४८९२ रुपयांचा हमीभाव मिळणे अशक्‍य आहे. जागतिक स्तरावर सोयाबीनचे भाव १० डॉलर प्रती बुशेल म्हणजेच ३०२४ रुपये प्रति क्‍विंटल आहेत.

त्याचवेळी सोया पेंडचे दर ३११ डॉलर प्रति टन म्हणजेच ३१ डॉलर प्रति क्‍विंटल (२६०४ रुपये प्रति क्‍विंटल) आहेत. ही बाब लक्षात घेता सोया पेंडचे दर ५००० रुपये प्रति क्‍विंटल झाले तरच सोयाबीनला ४८९२ ते ६००० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळू शकणार आहे. मात्र देशात स्वस्त जीएम सोया पेंड आयात केली जात आहे. परिणामी सोया पेंडच्या दरात तेजी शक्‍यच नाही. त्यामुळेच सोयाबीन दरात तेजीचा एकमेव पर्याय म्हणजे उत्पादीत सोयाबीनची १०० टक्‍के शासकीय खरेदी व त्याला २० टक्‍के बोनस देण्याची सरकारने घोषणा करावी, हा असल्याचे जावंधिया यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT