Raisins  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Rate : बेदाणा सौदे सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय

बेदाण्याचे येणे-देणे पूर्ण करण्यासाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता. १२) व्यापारी, अडते, बाजार समिती प्रशासन यांची एकत्रिक बैठक होणार आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली ः बेदाण्याचे (Raisin Payment) येणे-देणे पूर्ण करण्यासाठी बेदाण्याचे सौदे (Raisin Trade) एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता. १२) व्यापारी, अडते, बाजार समिती प्रशासन यांची एकत्रिक बैठक होणार आहे. या बैठकीत शून्य पेमेंटबाबत आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच सौदे कधी सुरू करायचे याचा निर्णय होणार असल्याची माहिती बेदाणा व्यापारी संघटनेने (Raisin Trade Association) दिली.

सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी संघटनेतर्फे बेदाणा व्यवहारात पारदर्शकता यावी. पेमेंटची देवाण-घेवाण योग्य वेळेत व्हावी यासाठी शून्य पेमेंट संकल्पना सुरू झाली. फसव्या खरेदीदारांना अटकाव करण्यासाठी दिवाळीला येणी-देणी पूर्ण करण्याचा नियम संघटनेने अंमलात आणला आहे.

यंदाच्या बेदाणा सौद्यातील शून्य पेमेंट पूर्ण करण्यासाठी आक्टोबर महिन्यातील १३ तारखेला एक महिना बेदाण्याचे सौदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शीतगृहावरील सौदेदेखील बंद ठेवण्यात आले आहेत.

बाजार समितीत शनिवारी बैठक

व्यापाऱ्यांनी सर्व येणी-देणी पूर्ण केली आहेत काय, यासंदर्भात शनिवारी (ता. १२) बैठक आयोजित केली आहे. ही बैठक बाजार समितीत होण्याची शक्यता आहे. या बैठकीत व्यापारी, अडते आणि बाजार समिती प्रशासन उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सर्व व्यापारी, अडते यांनी केलेल्या येणी-देणी याची माहिती घेतली जाईल.

https://www.youtube.com/watch?v=evN4Ais7Imo&ab_channel=Agrowonकोणकोणत्या व्यापाऱ्यांकडून अजून शून्य पेमेंटची पूर्तता झाली नाही, याचे रेकॉर्ड तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सांगली-तासगाव येथील शीतगृहात अद्याप किती बेदाणा शिल्लक आहे, याचा अंदाज घेतला जाणार आहे. त्यामुळे ही बैठक झाल्यानंतरच बेदाण्याचे सौदे कधी सुरू करायचे याचा निर्णय होईल.

एकाच बैठकीत निर्णय होणार का?

गतवर्षी शून्य पेमेंटची पूर्तता व्यापारी, अडत्यांना वेळेत करता आली नाही. त्यामुळे बेदाणा सौद्यातील कोट्यवधी रुपये येणे बाकी होते. परिणामी यासंदर्भात दोन ते तीन बैठकाही घेण्यात आल्या होत्या; मात्र, त्यावर मार्ग निघाला नव्हता. यामुळे बेदाण्याचे सौदे लांबणीवर पडले होते. यामुळे यंदा एकाच बैठकीत सौदे सुरू करण्याचा निर्णय होणार का, याकडे बेदाणा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT