Crop Dmaage
Crop Dmaage Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Crop Damage : मूग, उडदाची पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली

टीम ॲग्रोवन

अमरावती : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rain In Kharif Season) व सततच्या पावसामुळे मूग व उडदाचे पीक (Moong Urad Crop) शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. (Moong Urad Crop Damage) उत्पादनाची सरासरी एकरी चार क्विंटलवरून काही किलोंवर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पिकांचा खरेदी विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र यंदा मात्र बाजार समितीत हवीतशी आवकच नाही. त्यामुळे दोन्ही पिके बुडाल्याचे दिसून येऊ लागले आहे.

जिल्ह्यातील दर्यापूर व अंजनगावसुर्जी या खारपाणपट्ट्यात मूग व उडदाचे तुलनेने अधिक पेरणी क्षेत्र आहे. या वर्षी जिल्ह्यात मुगाखाली ७७३९ हेक्टर व उडदाखाली १९०६ हेक्टर क्षेत्र होते. दर्यापूर तालुक्यात मुगाचे सर्वाधिक ७३०४ हेक्टर क्षेत्र आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यांत अतिवृष्टी व सततच्या पावसाने दोन्ही पिकांची मोठी हानी झाली आहे.

मूग व उडदाचे पेरणीक्षेत्र दरवर्षी कमी होत असतानाच यंदा मुगाचे ७७३९ व उडदाचे १९०६ हेक्टर क्षेत्र आहे. अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेंगा सडल्या. एकरी सहा हजार रुपयांपर्यंत या पिकांचा लागवडीचा खर्च येतो. चार ते सहा क्विंटल उत्पादनाचा अंदाज असतो. त्या तुलनेत यंदा उत्पादनाची सरासरी एकरी काही किलोंवर येण्याची शक्यता शेतीतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

पीक काढणीवेळीच पावसाचे थैमान

जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांना चांगलेच बेजार केले. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. संततधार पावसामुळे कापूस, सोयाबीन व तुरीचे उत्पादन घटले. त्यात मूग व उडदाची उत्पादनाची सरासरी किलोंवर आली आहे. मूग व उडदाच्या काढणीवेळीच पावसाने थैमान घातल्याने या पिकांना मोठा फटका बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT