Custard Apple Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Custard apple Producers : सीताफळ उत्पादकांनी विक्री व्यवस्थेवर लक्ष देण्याची गरज

सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादनाबरोबरच विक्री व्यवस्थेवर अधिक भर देण्याची गरज, असल्याचे प्रतिपादन सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टानी यांनी केले.

टीम ॲग्रोवन

जाफराबाद : सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी (Custard apple production) उत्पादनाबरोबरच विक्री व्यवस्थेवर अधिक भर देण्याची गरज, असल्याचे प्रतिपादन सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टानी (Sham Gattani) यांनी केले. ॲग्रोव्हिजन गटशेती संघ आयोजित नियमित मासिक चर्चासत्र व मराठवाडा मुक्ती संग्राम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

कृषी विभाग, आत्मा, जालना, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, बदनापूर यांच्या सहकार्याने, सीताफळ महासंघ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रँडेड नल बालानगर एक दिवसीय सीताफळ कार्यशाळा शिवारफेरी, सीताफळ फळ प्रदर्शन, क्षेत्रिय किसान गोष्टी असा भरगच्च कार्यक्रम जाफराबाद तालुक्यातील मौजे नळविहिरा (जि.जालना) येथील पाटील कृषी फार्मवर रविवारी (ता.९) पार पडला. त्यावेळी श्री गट्टानी बोलत होते.

अध्यक्षस्थानी दमोतराव पाटील मोरे होते. सीताफळ महासंघाचे राज्य उपाध्यक्ष एकनाथ आगे, कृषिभूषण भगवानराव काळे, कृषिभूषण सुदामराव सोळंके, कृषिभूषण बाळासाहेब कारखिले (अहमदनगर), ‘वृक्षाई’चे पृथ्वीराज तत्तापुरे (लातूर), कृषी विज्ञान केंद्र खरपुडीचे कार्यक्रम समन्वयक डॉ.श्रीकृष्ण सोनुने, कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिनकुमार सोमवंशी आदी उपस्थिती होते.

ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील यांनी प्रास्ताविक केले. नंदकिशोर देशमुख, सुधीर जोशी, गणेश बुरकुल, सुरेश पाखरे, रामप्रसाद खैरे या शेतकऱ्यांनी आपले विचार मांडले. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्प अंतर्गत लागवड झालेल्या सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या सीताफळ फळांची प्रदर्शनी यावेळी भरविली होती.

या प्रदर्शनातून मान्यवरांनी सर्व अंगाने उत्कृष्ट सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांची निवड केली. यात संजय दमोतराव मोरे (नळविहिरा) प्रथम, सुरेश प्रल्हाद पाखरे (टेंभुर्णी) द्वितीय तर संजय श्रीमंतराव देशमुख (दहिगाव) तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले.

प्रथम पुरस्कार्थिंना श्री. बोराडे यांनी एक हजार एक, द्वितीय व तृतीय पुरस्कार अनुक्रमे श्यामजी गट्टाणी व एकनाथ आगे यांनी व्यक्तिगत पाचशे एक रुपयाचे बक्षीस दिले.कार्यक्रमाचे बहारदार संचलन संदेश मोरे पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT